WhatsApp Latest New Feature : व्हॉट्सअ‍ॅपने लॉंच केले एक नवीन धमाल फीचर, आता स्वतःला सहजपणे मेसेज करा आणि महत्त्वाची माहिती साठवा

Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपने एक दमदार फीचर आणले आहे. या फीचरद्वारे तुम्हाला स्वतःशी चॅट करता येणार आहे. म्हणजेच इतरांबरोबरच तुमच्या स्वतःच्या खात्यावर मेसेज पाठवणे सोपे होणार आहे. इतर व्हॉट्सअ‍ॅप संभाषणांच्या अगदी शेजारी माहितीचा तुकडा सहज उपलब्ध ठेवण्याची सुविधा या नव्या फीचरमुळे मिळणार आहे. युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपवर नोट्स, कामांची यादी आणि खरेदीची यादी साठवता येणार आहे.

WhatsApp latest feature
व्हॉट्सअॅपचे नवे जबरदस्त फीचर 
थोडं पण कामाचं
  • व्हॉट्सअॅपच्या सुविधांवर सर्वांचे लक्ष
  • व्हॉट्सअॅपने आणली नवी दमदार सुविधा
  • आता स्वत:लाच मेसेज करून साठवा महत्त्वाची माहिती

Whatsapp New Feature : नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप हा आता आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक झाला आहे. आपली अनेक दैनंदिन कामे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे (WhatsApp)केली जातात. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपची कामगिरी आणि त्याच्या सुविधा यावर सर्वांचे लक्ष असते. आता व्हॉट्सअ‍ॅपने एक दमदार फीचर आणले आहे. या फीचरद्वारे तुम्हाला स्वतःशी चॅट (WhatsApp Chat)करता येणार आहे. म्हणजेच इतरांबरोबरच तुमच्या स्वतःच्या खात्यावर मेसेज पाठवणे सोपे होणार आहे. इतर WhatsApp संभाषणांच्या अगदी शेजारी माहितीचा तुकडा सहज उपलब्ध ठेवण्याची सुविधा या नव्या फीचरमुळे मिळणार आहे. याचा उपयोग करून तुम्हाला अनेक माहिती वापरता येणार आहे. या नव्या सुविधेचे नाव "मेसेज युवरसेल्फ" (Message Yourself)असे आहे. या वैशिष्ट्यामुळे युजर्सना WhatsApp वर नोट्स, कामांची यादी आणि खरेदीची यादी यासारख्या अनेक गोष्टी स्वत:लाच पाठवणे शक्य होणार आहे. (WhatsApp launches new feature for users for self messaging read in Marathi)

अधिक वाचा - Garlic Benefits in Winter: हिवाळ्यात असे करा लसणाचे सेवन...अनेक आजार पळतील दूर

कधी मिळणार सुविधा आणि कसा करायचा वापर

व्हॉट्सअॅपने या नव्या मेसेजिंग सुविधेची घोषणा केली असून सर्व Android आणि iPhone युजरपर्यत ही सुविधा येत्या आठवड्यांमध्ये पोचणार आहे. सुरुवातीला काही बीटा परीक्षकांसह या सुविधेची चाचणी घेण्यात आली होती. आता हे वैशिष्ट्य जागतिक स्तरावर वापरण्यास सुरूवात झाल्याची माहिती देण्यात आली आहे.  युजर्सना त्यांचे स्वत:चे नाव कॉन्टॅक्ट लिस्टच्या सर्वात वर दिसणार आहे. त्यावर टॅप केल्यानंतर चॅट स्क्रीन उघणार असून त्यामध्ये युजर स्वत:ला पाठवण्याच मेसेज किंवा माहिती पाठवू शकणार आहेत. व्हॉट्सअॅपवर स्वत:ला मेसेज करण्याचे हे वैशिष्ट्य आले असले तरी काही युजर याचा वापर आधीच काही काळापासून करत आहेत. अॅपच्या “क्लिक टू चॅट” वैशिष्ट्याचा वापर करून तुम्ही आधीच स्वतःला संदेश पाठवू शकता. युजर त्यांचे स्वत:साठीचे मेसेज लिस्टच्या सर्वात वर पिन करून ठेवू शकतील. त्यामुळे इतर सर्व संभाषणांमध्ये त्यांना हे चॅट शोधावे लागणार नाही.

अधिक वाचा - जीवनात नव्याने भरतील रंग, या Relationship Tips ने वैवाहिक आयुष्यात होईल दंग

प्रतिस्पर्धी अॅप्समध्ये काय आहेत सुविधा

WhatsAppचे प्रतिस्पर्धी असलेले अॅप सिग्नलमध्ये (Signal)नोट टू सेल्फ नावाचे वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये याच प्रकारची सुविधा आहे. यामध्ये तुम्हाला वैयक्तिक वापरासाठी संदेश तयार करता येतात. मात्र ज्याप्रमाणे व्हॉट्सअॅप आपल्या स्वत:साठी असलेले चॅट लिस्टच्या सर्वात वर ठेवू देते त्याप्रमाणे सिग्नलमध्ये करता येत नाही. सिग्नलमध्ये युजर्सना ते नोट टू सेल्फ या नावाखाली शोधावे लागते. त्याचप्रमाणे आणखी एक प्रतिस्पर्धी अॅप स्लॅककडे "जॉट समथिंग डाउन" नावाची एक सुविधा आहे. ज्यात युजर स्वतःला नोट्स किंवा मेसेज पाठवू शकतात.

अधिक वाचा - Honeymoon Tips: हनीमूनला गेल्यावर चुकूनही करू नका 'या' 8 चुका, अन्यथा मजा ठरेल सजा

टेलीग्राम देखील सेव्ह्ड मेसेजेस नावाचे एक समान वैशिष्ट्य युजरना देते. या सुविधेत युजरना कोणतेही महत्त्वाचे संदेश बुकमार्क करता येतात. त्याप्रमाणे युजरना त्यांच्या नोट्स आणि यादी, इथर माहिती जतन करता येते. एकदा सेव्ह केलेले मेसेज चॅट स्क्रीनच्या वरच्या भागावरून ऍक्सेस केले जाऊ शकतात. मात्र टेलीग्रामच्या युजरना सुरुवातीला Android वर हॅम्बर्गर मेनू टॅप करून किंवा iOS वरील सेटिंग्ज मेनूद्वारे या वैशिष्ट्यात प्रवेश करणे आवश्यक आहे. त्या तुलनेत  आपल्या युजरना ही सुविधा सहजपणे वापरता यावी आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या आपण पुढे राहावे असा व्हॉट्सअॅपचा प्रयत्न आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी