Whatsapp messages can be deleted even after two days : Whatsapp ने एक महत्त्वाचे अपडेट लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज हा पाठवल्यापासून एक तास आठ मिनिटे आणि १६ सेकंदांच्या कालावधीत डीलीट करता येतो. पण नव्या अपडेट नंतर पाठवलेला मेसेज हा पाठवल्यापासून ६० तासांच्या आत अर्थात अडीच दिवसांत कधीही डीलीट करता येईल. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅपने निवडक युझरना हे अपडेट पुरवले आहे. त्यांच्या वापराचा आढावा घेऊन नवे अपडेट जगभर लाँच केले जाईल.
व्हॉट्सअॅप वेळोवेळी अपडेट करून आपण व्हॉट्सअॅपची आधुनिक फीचर (वैशिष्ट्ये) वापरू शकता. मेसेज डीलीट करण्याचे ६० तासांच्या मर्यादेचे फीचर लवकरच जगभरातील युझरसाठी लाँच केले जाईल. सध्या हे फीचर WhatsApp ने बीटा टेस्टरसाठी लाँच करण्यास सुरुवात केली आहे.
व्हॉट्सअॅपच्या ग्रुप अॅडमिनला ग्रुपमधील कोणाचाही कोणताही मेसेज डीलीट करण्याचे अधिकार देणारे एक फीचर लवकरच लाँच होणार आहे. भारत सरकारच्या आग्रही मागणीचा विचार करून हे फीचर लाँच करण्याची तयारी सुरू आहे.
व्हॉट्सअॅपवरून काही वेळा दिशाभूल करणारी माहिती कळत नकळत आपल्याला पाठवली जाते. यामुळे तणाव निर्माण होण्याचा धोका असतो. पण अॅडमिडनकडे व्हॉट्सअॅप नियंत्रणाचे अधिकार दिल्यास अफवांना आळा घालण्यास मदत होईल.
भारत सरकारने ग्रुपच्या अॅडमिनकडे संबंधित ग्रुपमधील कंटेटवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. व्हॉट्सअॅपने ही मागणी पूर्ण करण्याची तयारी केली आहे. लवरच हे नवे अपडेट पण भारतातील सर्व स्मार्टफोनमध्ये वापरता येईल.