व्हॉट्सअॅप घेऊन आलंय हे 5 नवे जबरदस्त फिचर्स, कसं होणार अपडेट जाणून घ्या 

WhatsApp New Feature in Marathi: व्हॉट्सअॅपवर बरेच नवीन फिचर येणार आहेत. जे युजर्संच्या पसंतीस उतरतील. जाणून घेऊयात काय आहेत व्हॉट्सअॅपचे नवीन फिचर.  

Whatsapp
व्हॉट्सअॅप घेऊनं आलंय हे 5 नवे जबरदस्त फिचर्स  |  फोटो सौजन्य: BCCL

व्हॉट्सअॅपवर येणारे फिचर नेहमीच उत्साहित करणारे असतात. व्हॉट्सअॅप आपल्या नव्या फिचरसंबंधीची माहिती सामान्यतः लवकरच शेअर करत नाही. पण यांच्याशी संबंधित वृत्त फिचर लॉन्च होण्याआधीच पसरतात. व्हॉट्सअॅप हे फिचर बीटा फेजमध्ये टेस्ट करते. ज्यामुळे समजू शकेल की युजर्सला फिचर कसं वाटत आहे. 

यावर्षी व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचर संबंधीत बरेच वृत्त आलेत. काही संबंधित व्हॉट्सअॅप फीचर सारखे- स्प्लॅश स्क्रीन, सेल्फ डिस्ट्रक्टिंग मॅसेज, हाइड किंवा म्यूट स्टेटस, व्हॉट्सअॅप ग्रुप प्रायव्हेसी फिचर आणि काही अन्य वृत्त येत आहे. यातून काही फिचर व्हॉट्सअॅप बीटा अॅन्ड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे. जाणून घेऊया व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या या नव्या 5 फिचर्संबद्दल.

Self-destructing WhatsApp messages

व्हॉट्सअॅपचा सेल्फ ड्रिस्टक्टिंग मॅसेज खूपच जास्त ओव्हर एक्साइटिंग आहे. जसं की नावातूनच स्पष्ट आहे की व्हॉट्सअॅपचा मॅसेज स्वतःहून डिलीट होईल. व्हॉट्सअॅप यूजर्स हा फिचर मॅन्युअली ऑन करू शकता आणि एक वेळेनंतर सिलेक्ट केलेले मॅसेज स्वतःहून डिलीट होतील. हे फिचर डिलीट फॉर एवरीवन पेक्षा वेगळं आहे. मात्र थोडंफार सारखंच आहे. डिलीट झाल्यानंतर सेल्फ डिस्ट्रक्टिंग मॅसेज दिसणार नाही आणि असं वाटेल की हे मॅसेज कधी पाठवलेच नव्हते. 

Hide muted WhatsApp status

ज्या लोकांना व्हॉट्सअॅपचं स्टेटस फिचर त्रासदायक वाटतं. त्यांना व्हॉट्सअॅपचं हे फिचर नक्की आवडेल. व्हॉट्सअॅप युजर्संना स्टेटस म्यूट करण्याची सुविधा देतं. मात्र त्यानंतरही त्याच्या स्क्रिनच्या खाली स्टेटस दिसतात. या फिचरच्या मदतीनं युजर्स पूर्णपणे व्हॉट्सअॅप स्टेटस हाइड किंवा म्यूट करू शकता. 

New WhatsApp group privacy 

व्हॉट्सअॅप या फिचरची टेस्टिंग बऱ्याच महिन्यांपासून करत आहे. या फिचरच्या मदतीनं युजर्स स्वतःला कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड होण्यापासून थांबवू शकता. युजर्संना 'Everyone', 'My Contacts' किंवा 'Nobody' चा पर्याय मिळतो.  ज्यानं तुम्ही हे निश्चित करू शकता की तुम्हाला कोणी व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये अॅड करू शकतं आणि कोणी नाही. नव्या अपडेटमध्ये व्हॉट्सअॅप 'Nobody' पर्याय 'My Contacts expect'च्या पर्यायातून हटवण्यात आलं आहे. 

WhatsApp Splash screen

हे काही नवीन फिचर नाही आहे तर व्हॉट्सअॅपचं यूआयचं अपडेट आहे. या फिचरच्या अंतर्गत जसं की कोणताही युजर व्हॉट्सअॅप ओपन करेल, त्याला व्हॉट्सअॅपचा लोगो असलेली एक स्क्रीन दिसायला सुरूवात होईल. याला स्प्लॅश स्क्रीन नाव देण्यात आलं आहे. हे फिचर सध्या व्हॉट्सअॅप बीटा यूजर्ससाठी अॅन्ड्रॉईड आणि आयओएसवर उपलब्ध आहे. 

WhatsApp Dark mode

अन्य येणाऱ्या फिचरसोबतच व्हॉट्सअॅपचं डार्क मोड फिचर सुद्धा गेल्या एका वर्षापासून चर्चेत आहे. व्हॉट्सअॅप डार्क मोड फिचर बऱ्याचदा बीटा फेजमध्ये टेस्टिंगच्या दरम्यान बघायला मिळालं. सध्या व्हॉट्सअॅप हे फिचर नव्या फिचरसोबत विकसित करत आहे. या फिचरच्या लॉन्चिंग संदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. हे फिचर सध्या बीटा फेजमध्येही उपलब्ध नाही आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी