Whatsapp: व्हॉट्सअॅप पे आल्यास पेटीएमचं होणार नुकसान

सोशल सॅव्ही
Updated May 06, 2019 | 16:22 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

व्हॉट्सअॅपचं पेमेंट अॅप व्हॉट्सअॅप पे आल्यानंतर पेटीएमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. भारतात डिजीटल पेमेंटचा बाजार वाढत चालला आहे. यावर कॅप्चर करण्यासाठी मोठमोठ्या कंपन्यामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.

Whatsapp
Whatsapp: व्हॉट्सअॅप पे आल्यास पेटीएमचं होणार नुकसान 

paytm vs Whatsapp pay: सध्या सर्वांत जास्त वापरल जाणारं मॅसेजिंग अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. सुरूवातीपासून आतापर्यंत व्हॉट्सअॅपनं आपल्या अॅप्लिकेशनमध्ये बरेच बदल केले. कंपनी भारतात व्हॉट्सअॅप पे लॉन्च करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क जुकरबर्ग यांनी २४ एप्रिलला घोषणा केली. त्यानंतर देशात डिजीटल पेमेंट्स कंपन्यांना स्पष्ट संदेश मिळाला की, त्यांना आता बाजारात सांभाळून राहण्याची वेळ आली आहे. 

२०२३ साली जवळपास १००० अरब डॉलरचा व्यापार होणाऱ्या देशाच्या डिजीटल पेमेंट उद्योगात यावर्षी क्रांतिकारी बदल होणार आहे. जेव्हा जागतिक स्तरावरील कंपन्या भारतात उपस्थित कंपन्यांना आव्हान देतील. भारतात या उद्योगात सध्यातरी अलीबाबाच्या सह्योगी कंपनी पेटीएमचं राज्य आहे. 

अॅमेझॉननं काही दिवसांपूर्वीच पियर-टू-पियर (पीटूपी) ट्रान्झकॅशन बाजारात आपल्या अॅन्ड्रॉईड ग्राहकांसाठी अॅमेझॉन पे यूपीआय लॉन्च केलं आहे. गूगल पे नं देखील 4.5 कोटी यूजर्संकडे आपली उपस्थिती मजबूत केली आहे. गूगल पे वर मार्च महिन्यात ८१ अरब डॉलरची घेवाण-देवाण झाली. 

अॅप्पल पे देखील येणार आहे आणि भारतात आयफोनच्या किंमती कमी करण्यासोबत ३९ कोटी जागतिक पेड ग्राहक असलेली ही सेवा १० अरब ग्राहकांना लक्ष्य करण्याच्या मार्गावर आहे. त्यात आता व्हॉट्सअॅप पे वास्तविक रूपात क्रांतिकारी सिद्ध होणार आहे. याच्यामागे देखील एक सामान्य कारण आहे. व्हॉट्सअॅपकडे भारतीय डिजीटल पेमेंट्स मार्केटमध्ये वरच्या स्थानावर येण्याची क्षमता आहे. 

व्हॉट्सअॅपचे भारतात सध्या स्थितीत ३० कोटी यूजर्सं आहे (फेसबुकवर भारतात ३० कोटी अन्य यूजर्स) आणि त्याचे पीटूपी यूपीआय आधारित पेमेंट सेवा सुरू केल्यास ती संख्या २३ कोटी यूजर्सं असलेल्या पेटीएममधून पुढे निघून जाईल. 

सीएमआरची इंडस्ट्री इंटेलिजेंन्स ग्रुप ( आयआयजी) चे प्रमुखे राम यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितलं की, भारतीयांचं व्हॉट्सअॅप हे आवडीचं अॅप आहे.त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून होणारी देवाण घेवाण देणाऱ्या सेवेला देखील पसंत करतील. मी अंदाज लावत आहे की, उद्योजक आणि लहान मध्यम उद्योग व्हॉट्सअॅप पे वापरतील आणि त्याचा उपयोग करतील. 

पुढे राम यांनी सांगितलं की, यामुळे त्यांची विश्वासार्हता वाढेल. त्याच्या बदल्यात यामुळे बँकसारख्या सामान्य स्रोतांकडून कर्ज घेणे सोपे जाईल. 

पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांना माहित आहे की भविष्यात आमचा सामना भयंकर जागतिक प्रतिस्पर्धकांशी होणार आहे. शर्मा यांनी गेल्या वर्षी ट्विटरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी फेसबुकवर निशाणा साधला होता. 

शर्मा यांनी ट्विट केलं होतं की, मूळ फिचर्सला किंमत न देता भारताच्या खुल्या इंटरनेट बाजारात यश मिळवण्यात अपयशी झाल्यानंतर फेसबुक पुन्हा एकदा लढाई करत आहेत. व्हॉट्सअॅपनुसार, जवळपास १० लाख लोकांनी रूपयांची देवाण-घेवाणीसाठी व्हॉट्सअॅप पेचं परिक्षण केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Whatsapp: व्हॉट्सअॅप पे आल्यास पेटीएमचं होणार नुकसान Description: व्हॉट्सअॅपचं पेमेंट अॅप व्हॉट्सअॅप पे आल्यानंतर पेटीएमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. भारतात डिजीटल पेमेंटचा बाजार वाढत चालला आहे. यावर कॅप्चर करण्यासाठी मोठमोठ्या कंपन्यामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola