WhatsApp Status: व्हॉट्सअॅप स्टेटस फिचर अपडेट, फेसबुकवरही शेअर करा स्टेटस

WhatsApp Status Feature Update: व्हॉट्सअॅप स्टेटस फिचरचा उपयोग मोठ्या संख्येनं लोक करतात. मात्र तुम्हांला माहित आहे का व्हॉट्सअॅप स्टेटस तुम्ही फेसबुकवरही शेअर करू शकता. कसं ते जाणून घ्या. 

Whatsapp
व्हॉट्सअॅप स्टेटस फिचर अपडेट, फेसबुकवरही शेअर करा स्टेटस  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • आता व्हॉट्सअॅपचे शेअर फेसबुकही शेअर करता येणार
 • जुने स्टेटस अन्य अॅपवर शेअर करू शकणार
 • नवीन व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुक स्टोरीवर शेअर करा

मुंबईः  व्हॉट्सअॅपचे स्टेटस फिचर खूप कमी कालावधीत प्रसिद्ध झालं. हे फिचर जगजाहीर आहे. लोकांमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस फिचरची खूप चर्चा होत असते. आता व्हॉट्सअॅप स्टेटससोबत आणखी एक अन्य फिचर जोडलं जातं आहे. ज्याच्या मदतीनं तुम्ही व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुकसह अन्य अॅपवरही शेअर करू शकणार आहात. व्हॉट्सअॅपचा हे फिचर सध्या व्हॉट्सअॅप बीटा व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुकवर शेअर करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी फेसबुक किंवा फेसबुक लाइट अॅप आपल्या फोनवर डाऊनलोड करणं गरजेचं आहे. विविध अपडेटसाठी तुम्हांला काही स्टेप फॉलो करावे लागतील. 

व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुक किंवा कोणत्या अन्य अॅपवर शेअर करण्यासाठी  

 1. सर्वांत पहिलं तुम्हांला तुमच्या फोवर व्हॉट्सअॅप ओपन करावं लागेल. 
 2. स्टेटच्या पर्यायावर क्लिक करा. 
 3. आपलं स्टेटस अपडेट करा. 
 4. तुम्हाल स्टेट नवीन किंवा जुन्याच्या आधारावर दो शेअरिंग पर्याय मिळेल. 

नवीन व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुक स्टोरीवर शेअर करणे

 1. नवीन स्टेटस शेअर करण्यासाठी तुम्हाला माय स्टेटसवर जावं लागेल आणि शेअर फेसबुक स्टोरी पर्यायावर क्लिक करा. 
 2. जेव्हा पॉप अप येईल तेव्हा तुम्हाला अलाउ किंवा ओपन यावर टॅप करावं लागेल. जो तुम्हाल फेसबुकवर घेऊन जाईल. 
 3. फेसबुकवर तुम्ही लोकांची संख्या निवडून शेअरच्या पर्यायावर टॅप करा. 
 4. मात्र लक्षात ठेवा की, जर का तुम्ही आणखी कोणता टॅब सुरू केल्यास फेसबुक स्टोरीचा पर्याय गायब होणार. 

जुने व्हॉट्सअॅप स्टेटसला फेसबुक स्टोरीवर शेअर 

 1. सर्वांत आधी माय स्टेटस पर्यायवर जा किंवा माय स्टेटसवर उपस्थित मोर पर्यायावर जा. 
 2. मोरच्या पर्यायावर किंवा तीन डॉटवर क्लिक करा. त्यानंतर शेअर टू फेसबुकवर क्लिक करा. 
 3. जेव्हा पॉप अप मॅसेज आल्यास अलाउ किंवा ओपनच्या पर्यायावर क्लिक करा. जो तुम्हाला फेसबुक अॅपवर घेऊन जाईल. 
 4. फेसबुक अॅपवर लोकांची संख्या सिलेक्ट करून शेअर नाऊवर क्लिक करा. 
 5. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्हॉट्सअॅप पुन्हा ओपन होईल. 

अन्य अॅपवर स्टेटस शेअर करण्यासाठी 

 1. व्हॉट्सअॅपवर जावा.
 2. स्टेटसवर क्लिक करा.
 3. क्रिएट स्टेटसवर क्लिक करा.

स्टेटस शेअर करण्यासाठी 

 1. माय स्टेटस पर्यायावर जा, शेअर करण्यासाठई आयकॉनवर क्लिक करा. लक्षात असू द्या की, जर का तुम्ही दुसरा टॅब सुरू केल्यास शेअरचा पर्याय गायब होईल. 
 2. जुने स्टेटस शेअर करण्यासाठी माय स्टेटसवर क्लिक करा. 
 3. मोर किंवा तीन डॉटवर क्लिक करा, जिथे तुम्हाला शेअरचा पर्याय मिळेल. 
 4. तुम्हाला एक शेअर टॅब दिसेल, ज्याच्या मदतीनं तुम्ही कोणत्याही अन्य अॅपवर सुद्धा आपलं व्हॉट्सअॅप स्टेटस शेअर करू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
WhatsApp Status: व्हॉट्सअॅप स्टेटस फिचर अपडेट, फेसबुकवरही शेअर करा स्टेटस Description: WhatsApp Status Feature Update: व्हॉट्सअॅप स्टेटस फिचरचा उपयोग मोठ्या संख्येनं लोक करतात. मात्र तुम्हांला माहित आहे का व्हॉट्सअॅप स्टेटस तुम्ही फेसबुकवरही शेअर करू शकता. कसं ते जाणून घ्या. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola