WhatsApp Status: व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी, आता व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये दिसणार ‘हा’ बदल

सोशल सॅव्ही
Updated May 26, 2019 | 21:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

WhatsApp: व्हॉट्सअॅप सतत स्वत:ला अपडेट करत असतं. आता लवकरच व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या सर्व यूजर्सना व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये एक बदल झालेला बघायला मिळणार आहे. जाणून घ्या काय असेल हा बदल.

what's app new feature
लवकरच व्हॉट्सअॅपमध्ये हा होणार बदल 

मुंबई: लवकरच आपल्याला व्हॉट्सअॅपमध्ये जाहिरात बघायला मिळणार आहे. व्हॉट्सअॅपकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत मोफत मिळणाऱ्या या सेवेत आता आपल्याला जाहिरात दिसणार आहे. नेदरलँड इथं झालेल्या फेसबुकच्या शिखर बैठकीत फेसबुकनं खुलासा केलाय की, फेसबुक स्टेटस जाहिरात २०२० पासून सुरू होणार आहे. या आठवड्यात झालेल्या फेसबुकच्या शिखर बैठकीत हजर असलेल्या ऑलिवर पॉनटेविले यांनी ट्विट करत माहिती दिली की, ‘व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये दिसणाऱ्या स्टोरीत २०२० पासून जाहिरात दिसणार आहे.’

पहिल्यांदा याबाबतीतील माहिती गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात समोर आली होती. जेव्हा मीडियानं एका रिपोर्टनुसार ही माहिती दिली होती. व्हॉट्सअॅप हे सध्याचं सर्वात प्रसिद्ध मॅसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपच्या स्टेटस फीचरमध्ये यूजर्स टेक्स्ट, फोटो, व्हिडिओ आणि जीआयएफ शेअर करू शकतात. हे स्टेटर २४ तासांनंतर आपणहून निघून जातं.

WABetaInfo नं दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जन २.१८.३०५ वर स्टेटसमध्ये जाहिरात दिसतेय. सध्या ती दिसत नाहीय, मात्र भविष्यात जाहिरात बघितली जावू शकेल. व्हॉट्सअॅपवर ही जाहिरात फेसबुकच्या अॅडव्हर्टाइजमेंट सिस्टिमनुसार दिसेल. या जाहिरातीचा उपयोग व्यापारी वर्गाला अधिक होऊ शकेल. या जाहिरातीच्या मदतीनं मॅसेजिंग अॅपचा वापर करत व्यावसायिक आपला व्यवसाय वाढवू शकतील.

 

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गनं उचललेल्या या पावलामुळे व्हॉट्सअॅप मॅसेजिंग सर्व्हिसच्या को-फाऊंडरनं कंपनी सोडून दिली होती. फोर्ब्स या जगप्रसिद्ध मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत ब्रायन एक्टन यांनी सांगितलं होतं की, झुकरबर्ग मॅसेजिंग सर्व्हिसद्वारे पैसा कमावण्याच्या मागे लागलाय. त्यांनी जाहिरात दाखवण्याचा निर्णय घेतल्यानं एक्टन नाराज झाले होते. आता इंस्टाग्रामवरील न्यूज फीडमध्ये जाहिरात दिसू लागलीय. अशीच जाहिरात आता व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये लवकरच दिसणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपनं नवीन इमोजी स्टाईल फीचर लॉन्च करण्याचं स्पष्ट केलं होतं. हे नवीन इमोजी एनिमेटेड स्टाईलमध्ये असून ते सुद्धा व्हॉट्सअॅप स्टेटससाठी वापरता येणार आहे. लवकरच हे फीचर व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉईड, आयफोन आणि वेबसाठी दिसेल. तर त्यापूर्वी व्हॉट्सअॅपनं लँडलाईनवरुनही व्हॉट्सअॅप वापरता येईल, असं फीचर आणणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. व्हॉट्सअॅप यूजर्सच्या मागण्यांनुसार नवनवीन फीचर्स आणताना दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
WhatsApp Status: व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी, आता व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये दिसणार ‘हा’ बदल Description: WhatsApp: व्हॉट्सअॅप सतत स्वत:ला अपडेट करत असतं. आता लवकरच व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या सर्व यूजर्सना व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये एक बदल झालेला बघायला मिळणार आहे. जाणून घ्या काय असेल हा बदल.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola