WhatsApp Tips | हे आहे धमाल फीचर! टाइप न करताच गुगलच्या मदतीने पाठवा व्हॉट्सअप मेसेज

Social Media : ट्सअपचा (WhatsApp)वापर हा आता सर्वत्र होतो. त्यामुळे व्हॉट्सअपद्वारे मेसेज पाठवणे ही आता दैनंदिन कामकाजाचीच बाब झाली आहे. अॅंड्राईड स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांसाठी व्हॉट्सअप ही अत्यावश्यक बाब बनली आहे. व्हॉट्सअपवर मेसेज (WhatsApp Message)पाठवण्याची एक युक्ती जाणून घेऊया. ही युक्ती तेव्हा उपयोगी ठरते जेव्हा लोक वाहन चालवत असतील आणि मेसेज टाइप करू शकणार नसतील. काहीवेळा कामात व्यस्त असल्यामुळेदेखील मेसेज टाइप करता येत नाहीत.

WhatsApp tips
व्हॉट्सअप टिप्स 
थोडं पण कामाचं
  • व्हॉट्सअपचे मेसेज पाठवायची भन्नाट युक्ती
  • गुगलच्या मदतीने पाठवा व्हॉट्सअप मेसेज तेही टाइप न करता
  • व्हॉट्सअप आणत असते नवनवीन फीचर्स

WhatsApp Tips | नवी दिल्ली: व्हॉट्सअपचा (WhatsApp)वापर हा आता सर्वत्र होतो. त्यामुळे व्हॉट्सअपद्वारे मेसेज पाठवणे ही आता दैनंदिन कामकाजाचीच बाब झाली आहे. अॅंड्राईड स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांसाठी व्हॉट्सअप ही अत्यावश्यक बाब बनली आहे. व्हॉट्सअपवर मेसेज (WhatsApp Message)पाठवण्याची एक युक्ती जाणून घेऊया. ही युक्ती तेव्हा उपयोगी ठरते जेव्हा लोक वाहन चालवत असतील आणि मेसेज टाइप करू शकणार नसतील. काहीवेळा कामात व्यस्त असल्यामुळेदेखील मेसेज टाइप करता येत नाहीत. अशावेळी मेसेज कसा पाठवायचा याची युक्ती जाणून घेऊया. (WhatsApp tip to send messages with the help of google)  

गुगलचा वापर करून तुम्ही गुगल असिस्टंटद्वारे व्हॉट्सअॅप मेसेज पाठवू शकता. खाली देण्यात आलेल्या स्टेप्स वापरून ही युक्ती तुम्हाला अंमलात आणता येईल.

  1. - आपल्या अॅंड्रॉईड मोबाइल किंवा स्मार्टफोन किंवा टॅब्लेटवर होम बटणावर टच केल्यानंतर होल्ड करून ठेवा आणि मग बोला Hey Google।
  2. - यानंतर म्हणा Send a message to आणि त्या व्यक्तीचे नाव ज्याचा नंबर तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह केलेला आहे
  3. -व्हॉइस असिस्टंट त्या कॉन्टॅक्टला ओळखेल आणि त्यानंतर तुम्हाला मेसेज पाठवण्यासाठी अॅप निवडण्यास सांगितले जाईल. तुम्ही डिफॉल्ट मेसेज अॅप व्हॉट्सअप असे निवडा.
  4. -अॅप निवडल्यानंतर गुगल असिस्टंट तुम्हाला मेसेज विचारेल. त्यानंतर जो मेसेज तुम्हाला पाठवायचा आहे तो त्याच्यावर बोला आणि सेंड करा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे जर मेसेज बोलताना तुम्ही लांब पॉझ घेतला तर गुगल असिस्टंट तो ऐकणे बंद करेल.
  5. यानंतर व्हॉइस असिस्टंट तुमच्या मेसेजला रीपिट करेल. जर तुमचा मेसेज योग्य असेल तर येस म्हणा. पाठवण्याआधी गुगल असिस्टंट पुन्हा एकदा तुमचा मेसेज वाचून दाखवेल.
     

भारतासह जगभर प्रचंड लोकप्रिय असलेले व्हॉट्सअॅप WhatsApp हे मेसेजिंग अॅप अपडेट होणार आहे. नव्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये व्हॉट्सअॅपमध्ये अनेक नवी फीचर्स (वैशिष्ट्ये) दिसतील. यापैकी पाच प्रमुख नवी फीचर्स (वैशिष्ट्ये) कोणती असतील याबाबत तज्ज्ञांनी संकेत दिले आहेत. अपडेट नंतर व्हॉट्सअॅपच्या चॅटिंग आणि कॉलिंगचे स्वरुप बदलून जाईल; असेही तज्ज्ञांनी सांगितले.  

आजकाल बहुतेक युजर्स गुगल क्रोम ( Google Chrome ) वापरतात. जर तुम्ही देखील हाच ब्राउझर (browser) देखील वापरत असाल तर तुम्हाला काळजी घेणे आवश्यक आहे. कारण इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने यूजर्सना त्यांचा ब्राउझर त्वरित अपडेट करण्यास सांगितले आहे. चेतावणी (alert) फक्त त्या युजर्ससाठी आहे जे 97.0.4692.71 पेक्षा जुनी Chrome आवृत्ती वापरत आहेत. असे युजर्स हॅकर्सचे शिकार होऊ शकतात. एवढेच नाही तर त्यांचे डिटेल्स हॅकर्सकडे जाऊन युजर्स मोठ्या अडचणीत येऊ शकतात. टाइप गोंधळामुळे गुगल क्रोम V8 मध्ये वापरण्यासाठी सुरक्षित नाही. यात वेब अॅप, यूजर इंटरफेस, स्क्रीन कॅप्चर, फाइल एपीआय, ऑटो-फिल आणि डेव्हलपर टूल्स यासारख्या अनेक कमतरता ओळखल्या आहेत. सरकारचे म्हणणे आहे की जर एखाद्या युजर्सने गुगल क्रोम अपडेट केले नाही तर डिव्हाइसचे रिमोट हॅक होण्याचा धोका कायम राहील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी