नव्या वर्षात WhatsApp अपडेट होणार, पाच नवी फीचर्स येणार, चॅटिंग-कॉलिंगचे स्वरुप बदलणार

WhatsApp upcoming features new call interface to quick replies : भारतासह जगभर प्रचंड लोकप्रिय असलेले व्हॉट्सअॅप WhatsApp हे मेसेजिंग अॅप अपडेट होणार आहे. नव्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये व्हॉट्सअॅपमध्ये अनेक नवी फीचर्स (वैशिष्ट्ये) दिसतील. यापैकी पाच प्रमुख नवी फीचर्स (वैशिष्ट्ये) कोणती असतील याबाबत तज्ज्ञांनी संकेत दिले

WhatsApp upcoming features new call interface to quick replies
नव्या वर्षात WhatsApp अपडेट होणार, पाच नवी फीचर्स येणार, चॅटिंग-कॉलिंगचे स्वरुप बदलणार 
थोडं पण कामाचं
  • नव्या वर्षात WhatsApp अपडेट होणार, पाच नवी फीचर्स येणार, चॅटिंग-कॉलिंगचे स्वरुप बदलणार
  • नवा कॉलिंग इंटरफेस, एंड-टू-एंड एन्क्रिप्शन इंडिकेटर, क्विक रिप्लाय
  • ग्रुप अॅडमिन सबलीकरण आणि कम्युनिटिज

WhatsApp upcoming features new call interface to quick replies : नवी दिल्ली : भारतासह जगभर प्रचंड लोकप्रिय असलेले व्हॉट्सअॅप WhatsApp हे मेसेजिंग अॅप अपडेट होणार आहे. नव्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये व्हॉट्सअॅपमध्ये अनेक नवी फीचर्स (वैशिष्ट्ये) दिसतील. यापैकी पाच प्रमुख नवी फीचर्स (वैशिष्ट्ये) कोणती असतील याबाबत तज्ज्ञांनी संकेत दिले आहेत. अपडेट नंतर व्हॉट्सअॅपच्या चॅटिंग आणि कॉलिंगचे स्वरुप बदलून जाईल; असेही तज्ज्ञांनी सांगितले. 

  1. नवा कॉलिंग इंटरफेस - WhatsApp Calls या पर्यायाचा वापर करुन युझर इंटरनेटच्या मदतीने दुसऱ्या व्हॉट्सअॅप युझरला कॉलिंग करू शकतो. लवकरच हा कॉलिंग इंटरफेस बदलणार आहे. मॉडर्न कॉलिंग इंटरफेस आणखी आकर्षक हाताळायला सोपा असेल. 
  2. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन इंडिकेटर - WhatsApp वर चॅट आणि कॉल एंड-टू-एंड एन्क्रिप्शन मोडवर राहतील आणि इंडिकेटरद्वारे त्याबाबतची ग्वाही युझरला सतत दिली जाईल.
  3. क्विक रिप्लाय - WhatsApp वर लवकरच quick replies हा शॉर्टकट अॅड होईल. हा पर्याय WhatsApp Business च्या युझरना आधी दिला जाईल. यामुळे व्यावसायिक वेळोवेळी प्रीसेट रिप्लाय देऊन ग्राहकांच्या संदेशांना तातडीने प्रतिसाद देऊ शकतील. यातून ग्राहक आणि व्यावसायिक यांचा संवाद वेगवान होईल. 
  4. ग्रुप अॅडमिन सबलीकरण - WhatsApp Group Admin सबलीकरण मोहिमेंतर्गत अॅडमिनच्या अधिकारांमध्ये वाढ केली जाईल. ग्रुप अॅडमिन ग्रुपमधील कोणत्याही सदस्याने ग्रुपवर पाठवलेला मेसेज डीलीट Delet करू शकतील. यामुळे आक्षेपार्ह संदेश पाठवून तणाव निर्माण करणाऱ्यांना तसेच ग्रुपमध्ये फेक मेसेज पाठवणाऱ्यांना आळा घालणे सोपे होईल. 
  5. कम्युनिटिज - WhatsApp वर Communities तयार करण्याचा पर्याय लवकरच उपलब्ध होईल. ग्रुप अॅडमिन वेगवेगळ्या कम्युनिटी तयार करुन त्यात सदस्यांना अॅड करू शकतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी