WhatsApp वापरकर्त्यांनो ऐकलं का तुमचा डेटा आहे धोक्यात; जाणून घ्या सर्व प्रकरण

डेटाबेसमध्ये यूएस, यूके, इजिप्त, इटली, सौदी अरेबिया आणि अगदी भारतासह 84 वेगवेगळ्या देशांतील व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे मोबाइल नंबर समाविष्ट आहेत. फिशिंग अटॅकसाठी अटॅकर्सद्वारे माहितीचा वापर केला जातो. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना अनोळखी नंबरवरून कॉल आणि मेसेज टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.

WhatsApp users have you heard your data is at risk
WhatsApp वापरकर्त्यांनो ऐकलं का तुमचा डेटा आहे धोक्यात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • डेटाबेसमध्ये यूएस, यूके, इजिप्त, इटली, सौदी अरेबिया आणि अगदी भारतासह 84 वेगवेगळ्या देशांतील व्हॉट्सअॅप युजर्सचे मोबाइल नंबर आहेत.
  • प्लॅटफॉर्म डेटाच्या उल्लंघनासाठी चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही.
  • जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

WhatsApp Data: नवी दिल्ली :  तुम्ही जर व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) यूजर्स (Users) असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. एका अहवालानुसार, सुमारे 500 दशलक्ष WhatsApp युजर्सचे फोन नंबर ऑनलाइन (Online) विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. सायबर न्यूजने आपल्या एका अहवालात नोंदवले आहे की, हॅकरने हॅकिंग कम्युनिटी फोरमवर एक जाहिरात पोस्ट केली आहे, ज्यात दावा केला आहे की, ते 487 दशलक्ष WhatsApp युजर्सच्या मोबाईल नंबरचा 2022 डेटाबेस विकत आहे. (WhatsApp users have you heard your data is at risk; Know all the cases)

अधिक वाचा  : प्रेमविवाह होत नाहीये? 'हा' मंत्र करेल तुमची मदत

डेटाबेसमध्ये यूएस, यूके, इजिप्त, इटली, सौदी अरेबिया आणि अगदी भारतासह 84 वेगवेगळ्या देशांतील व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे मोबाइल नंबर समाविष्ट आहेत. फिशिंग अटॅकसाठी अटॅकर्सद्वारे माहितीचा वापर केला जातो. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना अनोळखी नंबरवरून कॉल आणि मेसेज टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.दरम्यान, धमकी देणाऱ्या हॅकरचा दावा आहे की, डेटा सेटमध्ये 32 दशलक्ष यूएस युजर्सचे रेकॉर्ड आहेत. यात युजर्स इजिप्तमध्ये 45 दशलक्ष, इटलीमध्ये 35 दशलक्ष, सौदी अरेबियामध्ये 29 दशलक्ष, फ्रान्समध्ये 20 दशलक्ष आणि तुर्कीमध्ये 20 दशलक्ष आहेत. डेटाबेसमध्ये सुमारे 10 दशलक्ष रशियन आणि 11 दशलक्षाहून अधिक यूके नागरिक आणि सुमारे 61 लाख भारतीयांचे फोन नंबर असल्याचं सांगतिलं जात आहे. 

अधिक वाचा  : पुष्पा चित्रपटाच्या लाल चंदनासारखा पैसा आहे या व्यवसायात

अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, हॅकर US डेटासेट $700  (अंदाजे ₹5,71,690) मध्ये विकत आहे. UK आणि जर्मनी डेटासेटची किंमत अनुक्रमे $2, 500 (2, 84,175),आणि $2,000 अंदाजे 1,63,340 
आहे.

यापूर्वीही झाला होता युजर्सचा डेटा लीक :

मेटा आणि त्याचे प्लॅटफॉर्म डेटाच्या उल्लंघनासाठी चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, एका लीकस्टरने 500 दशलक्षाहून अधिक फेसबुक युजर्सची माहिती विनामूल्य ऑनलाइन उपलब्ध करून दिली. लीक झालेल्या डेटामध्ये फोन नंबर आणि इतर तपशीलांचा समावेश होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी