WhatsApp मध्ये येतायेत या ५ जबरदस्त सुविधा, बदलणार चॅटिंग स्वरुप

मार्क झुकरबर्गची कंपनी त्यासाठीच नाविन्यपूर्ण कल्पना राबवत असते. असेच काही फीचर्स व्हॉट्सअॅपमध्ये आगामी काळात दिसण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअॅपला आणखी दमदार बनवण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.

New WhatsApp features
व्हॉट्सअपचे नवे फीचर्स 

थोडं पण कामाचं

  • व्हॉट्सअॅप (WhatsApp) मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात
  • ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी म्हणून व्हॉट्सअॅप प्रयत्नशील
  • व्हॉट्सअॅप आणणार नवीन फीचर्स

नवी दिल्ली: व्हॉट्सअॅप हे सर्वात मोठे मेसेजिंग अॅप आहे. या अॅपची लोकप्रियता प्रचंड आहे. मात्र व्हॉट्सअॅप (WhatsApp) मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडते आहे. व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी धोरणासंदर्भात मोठा वाद निर्माण झाला होता. व्हॉट्सअॅपवर यानिमित्ताने टीकेची झोड उठली होती. अर्थात व्हॉट्सअॅप लोकांच्या दैनंदिन जीवनाचाच एक भाग बनल्यामुळे ते आजही सर्वाधिक वापरले जाणारे अॅप आहे. शिवाय त्यात नवनवीन युजर्सची भर पडते आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन आणि ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी म्हणून व्हॉट्सअॅप सातत्याने नवनवीन सुविधा किंवा फीचर्स (New WhatsApp features) उपलब्ध करून देत असते. (WhatsApp to include these 5 features to make it more attractive)

व्हॉट्सअॅप बनणार अधिक दमदार

व्हॉट्सअॅपला आणखी दमदार बनवण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. व्हॉट्सअॅपच्या लोकप्रियतेमागे याची एंड टू एंड एनक्रिप्टेड चॅट सर्व्हिस, स्टोरीज, व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉल आणि इतर मीडिया फीचर्स आहेत. अशातच जर व्हॉट्सअॅपमध्ये काही आणखी सुविधा किंव फीचर्स देण्यास आल्या तर हे अॅप आणखी जबरदस्त होईल. मार्क झुकरबर्गची कंपनी त्यासाठीच नाविन्यपूर्ण कल्पना राबवत असते. असे काही फीचर्स जे व्हॉट्सअॅपमध्ये आगामी काळात दिसण्याची शक्यता आहे ते पाहूया.

१. मेसेज रिअॅक्शन

फेसबुक मेसेंजर आणि आयमेसेजमध्ये हे फीचर आधापासूनच अस्तित्वात आहे. लवकरच व्हॉट्सअॅपमध्येदेखील कंपनी याचा समावेश करू शकते. म्हणजेच जर तुम्हाला उत्तर देण्याची इच्छा नसेल तर तुम्ही आता कोणत्याही मेसेजचे उत्तर ईमोजीद्वारे देऊ शकता. हे फीचर ग्रुप चॅट्समध्येदेखील उपलब्ध होईल.

२. चॅट बबल्स

व्हॉट्सअॅपच्या चॅट विंडोवर ग्राहकांचा बहुतांश वेळ जातो. त्यामुळेच अॅप यावर विशेष लक्ष देऊ इच्छिते. त्यामुळेच टेक्स्टच्या शेजारी असणाऱ्या ग्रीन बबल्सला रिडिझाईन केले जाणार आहे.

३. कॉन्टॅक्ट कार्ड

व्हॉट्सअॅप आता तुम्हाला आणखी चांगले डिझाइन कार्ड दाखवणार आहे. सध्या तुम्हाला यात फक्त फोटो दिसतो. नव्या डिझाइनमध्ये तुम्हाला कॉल, टेक्स्ट आणि व्हिडिओ कॉलचा डायरेक्ट पर्याय मिळेल. ग्रुप कॉन्टॅक्ट्स कार्डमध्ये तुम्हाला फक्त मेसेज पाठवण्याचा पर्याय मिळणार आहे.

४. नवे फोटो एडिटिंग टूल्स

कंपनीकडून फोटो एडिटर टूलवर काम सुरू आहे. युजर्स आता फोटोमध्ये स्टिकर्सदेखील वापरू शकतील आणि त्याला क्रॉपदेखील करू शकतील. शिवाय युजर्स फोटोमध्ये टेक्स्ट आणि इमोजीदेखील समाविष्ट करू शकतील.

५. व्हॉट्सअॅप पेमेंट शॉर्टकट

व्हॉट्सअॅप युपीआयवर आधारित पेमेंट सेवादेखील पुरवण्याचा विचार करते आहे. म्हणजेच चॅट बॉक्सवर तुम्हाला पेमेंटचा पर्याय उपलब्ध होईल. ही सुविधा आयओएसमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळेच लवकरच याचा समावेश अॅंड्राईड मध्येदेखील केला जाऊ शकतो.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच फेसबुक व्यतिरिक्त, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि ऑकुलस देखील सुमारे सहा तास पूर्णपणे ठप्प होते. रात्री उशिरा फेसबुकने सांगितले की, काही सेवा युजर्सद्वारे वापरल्या जाऊ शकतात. कंपनीने माफी मागितली पण समस्या कोठून आली हे सांगितले नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी