Whatsapp घेऊन येत आहे भन्नाट फिचर्स, पेमेंट फिचर लवकरच होणार लाँच

सोशल सॅव्ही
Updated May 10, 2019 | 15:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Whatsapp सातत्याने आपला यूजर्स एक्सिपिरियन्स वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. काही नवीन फिचर्स लॉंच करण्याचे काम सुरू आहे. त्यात पेमेंट फिचरपासून अगदी स्टिकर्स शेअर करण्याच्या नवीन व्हर्जनचाही समावेश आहे.

Whatsapp features
व्हॉट्सअप पेमेंट फिचर   |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली : सध्या भारतातीलच नव्हे, तर जगभरातील एक लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणून व्हॉट्सअपचा उल्लेख केला जातो. अर्थात त्यात शंका असण्याचे कारणही नाही. फेसबुकच्या मालकीचे असलेल्या अॅपमध्ये अजूनही यूजर्सचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक फिचर्सची चाचणी सुरू आहे. त्यात फोन पेमेंट फिचरची सगळ्यांना सर्वाधिक उत्सुकता आहे. नुकत्याच झालेल्या फेसबुकच्या एफ-८ डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये मार्क झुकरबर्गने व्हॉट्सअपच्या पेमेंट फिचरविषयी घोषणा केली आहे. पण, सध्या भारतात आणि इतर काही देशांमध्ये या फिचरची टेस्ट सुरू आहे. त्यानंतर जगभरात हे फिचर लाँच केले जाईल, असे झुकरबर्गने जाहीर केले आहे. पण, त्यासाठी किती अवधी लागणार किंवा हे फिचर नेमके केव्हा लाँच होणार याची घोषणा मात्र झुकरबर्गने केलेली नाही. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपचे डार्क व्हर्जन पाहायला मिळाले होते. पण. ते काढून टाकण्यात आल्याची माहिती आहे. अशा पद्धतीने अनेक फिचर्सचे टेस्टिंग सुरू आहे. एक नजर टाकूया कोण कोणती फिचर्स लाँच होणार आहेत यावर...

अनिमेटेड स्टिकर्स

व्हॉट्सअप बिटा इन्फोवरून मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअप यूजर्सना आता लवकरच अॅनिमेटेड स्टिकर्स शेअर करता आहेत. अँड्रॉइड स्मार्टफोन्स, आयफोन आणि व्हॉट्सअप वेबवरूनही ही स्टिकर्स शेअर करता येतील. ही स्टिकर्स जीआयएफप्रमाणे काही सेकंद प्ले होतील आणि पुन्हा थांबतील. सध्याच्या स्टिकर्सना जसा इतर अॅपचा आधार घ्यावा लागतो. तसाच या अॅनिमेटेड स्टिकर्सना घ्यावा लागणार आहे.

स्टिकर नोटिफिकेशन प्रिव्हू

व्हॉट्सअप बिटा इन्फोनुसार स्टिकर्ससाठी नोटिफिकेशन प्रिव्हूचा ऑप्शनदेखील देण्यात आला आहे. अँड्रॉइड २.१९.१३० अपडेट व्हर्जनमधील व्हॉट्सअप बिटामध्ये हे फिचर असल्याचे सांगण्यात आले आहे. या फिचरमुळे व्हॉट्सअप यूजरला नोटिफिकेशन बारमध्येच प्रिव्हू ऑप्शन मिळेल. सध्या आओएस ऑपरेटिंग सिस्टमवर अशा पद्धतीने स्टिकरचा प्रिव्हू पहायला मिळतो.

सतत फॉरवर्ड झालेले मेसेज

व्हॉट्सअप बिटा इन्फोनुसार व्हॉट्सअप सध्या दोन नवीन फिचर्स टेस्ट करत आहे. ज्यामध्ये फेक न्यूजला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. व्हॉट्सअपच्या या आगामी फिचरमध्ये फॉरवर्डिंगची अधिक माहिती मिळणार आहे. म्हणजेच एखादा मेसेज चारपेक्षा जास्त वेळ फॉरवर्ड केला गेला असले तर, तो "Frequently Forwarded" म्हणून युजरला दिसणार आहे. त्यामुळे एखादी पोस्ट खरचं व्हायरल होतीय का? याचा अंदाज येणार आहे.

इन-अॅप ब्राऊजर

व्हॉट्सअपच्या २.१९.७४ अँड्रॉइड बिटा व्हर्जनमध्ये इन अॅप इंटरनेट ब्राउजर हे फिचर पहायला मिळत आहे. व्हॉट्सअप बिटा इन्फोनुसार जेव्हा एखाद्याला मेसेजमधून लिंक मिळाली असले, तर ती व्हॉट्सअपच्या इन अॅप ब्राउजरमधूनच ओपन होणार आहे. विशेष म्हणजे, त्याची सर्च हिस्ट्री कोणालाही मिळवता येणार नाही. अगदी व्हॉट्सअप आणि फेसबुकलाही ते शक्य होणार नाही. कारण, अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) अंतर्गत या लिंक ओपन होणार आहेत. त्यामुळे प्रायव्हसीसाठी हे स्वागतार्ह असल्याचं बोललं जातंय. या सगळ्याच्या जोडीने आयएएसओ २.१९.४० अपडेट व्हर्जनसाठी व्हॉट्सअप बिटा आयपॅडलाही सपोर्ट करताना दिसत आहे. पण, व्हॉट्सअपचे नवीन आयपॅड व्हर्जन अजूनही विकसित करण्यात येत आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Whatsapp घेऊन येत आहे भन्नाट फिचर्स, पेमेंट फिचर लवकरच होणार लाँच Description: Whatsapp सातत्याने आपला यूजर्स एक्सिपिरियन्स वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. काही नवीन फिचर्स लॉंच करण्याचे काम सुरू आहे. त्यात पेमेंट फिचरपासून अगदी स्टिकर्स शेअर करण्याच्या नवीन व्हर्जनचाही समावेश आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola