Instagram तुम्हाला कोणी केलं अनफॉलो?, असं करा झटपट चेक

Instagram Unfollow: तुम्ही इंस्टाग्राम यूजर असाल आणि तुम्हाला कोणी अनफॉलो केले हे जाणून घ्यायचं असेल. तर आम्ही तुम्हाला यासाठी सोपा उपाय सांगणार आहोत.

who unfollowed you on instagram here is easy way to check
Instagram तुम्हाला कोणी केलं अनफॉलो?, झटपट चेक करण्याचा सोपा मार्ग (सौजन्य- UnSplash) 
थोडं पण कामाचं
  • पाहा कसं शोधता येईल इंस्टाग्रामवरील अनफॉलोवर्स
  • तुम्हाला इंस्टाग्रामवर कोण अनफॉलो करतं ते शोधा झटपट
  • अनफॉलोवर्स शोधण्यासाठी वापरावं लागेल थर्ड पार्टी अ‍ॅप

फेसबुकवर (Facebook) मित्र बनल्यानंतर दोन्ही प्रोफाईल जोडलेले असतात. पण, इन्स्टाग्राममध्ये (instagram) असं नसतं. यामध्ये एक युजर दुसऱ्या युजरला फॉलो करू शकतो आणि हे गरजेचं  नाही की, समोरच्या युजरनेही तुम्हाला फॉलो केलं पाहिजे. परंतु, अनेकदा काही इंस्टाग्राम यूजर्सचे फॉलोअर्स (Followers) कमी होऊ लागतात तेव्हा त्यांना कोण अनफॉलो करत आहे हे समजत नाही. इंस्टाग्राममध्ये यासाठी कोणतेही इन-बिल्ट टूल देखील उपलब्ध नाही. पण, हे कसे शोधायचे ते आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (who unfollowed you on instagram here is easy way to check)

तुमचे अनफॉलोअर फिल्टर करण्याचा तुमच्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे थर्ड पार्टी अ‍ॅप्स आहेत. ज्यांचे भरपूर फॉलोअर्स आहेत त्यांच्यासाठी मॅन्युअली अनफॉलोवर्स शोधणं हे खूप कठीण आहे. पण यासाठी सध्या अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. आपण इच्छित असल्यास FollowMeter हे अ‍ॅप वापरू शकता. जे वापरणे हे खूपच सोपे आहे.

अधिक वाचा: Google Play Store वरुन हटवण्यात आले हे 16 अ‍ॅप्स, पाहा संपूर्ण लिस्ट

यासाठी, प्रथम तुम्हाला तुमच्या Android किंवा iOS डिव्हाइसवर FollowMeter डाउनलोड करुन इंस्टॉल करावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला अ‍ॅपद्वारे इन्स्टाग्रामवर लॉगिन देखील करावे लागेल. 

यानंतर तुम्ही अ‍ॅपच्या मुख्य पेजवर याल. येथे तुम्हाला तुमचे अकाउंट मॅनेज करण्यासाठी अनेक पर्याय दिसतील. सहसा तुम्ही Unfollowers पर्यायाद्वारे अनफॉलोअर्सला ट्रॅक करु शकता. पण, पहिल्यांदाच यूजरला Not following back या ऑप्शनवर देखील जावं लागेल.

अधिक वाचा: New Ola Electric Scooter : ओलाची ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 25 पैशात पळणार 1 किमी, तुफान वैशिष्ट्ये...दिवाळीत बंपर सूट

जर, तुम्हाला कोणतेही थर्ड पार्टी अ‍ॅप वापरायचे नसेल तर तुम्हाला कोणी अनफॉलो केलं आहे मॅन्युअलीच शोधावं लागणार आहे. तुमच्‍या स्‍वत:च्‍या फॉलोअर्स लिस्टवर जाऊन तुम्‍हाला कोण फॉलो करत नाही ते तुम्ही पाहू शकता. आपण हवं असल्यास इतर यूजरच्या यादीमध्ये जाऊन देखील फॉलोवर्स तपासू शकता.

सध्या फेसबुकपेक्षा इंस्टाग्राम याचा सर्वाधिक वापर केला जात आहे. अनेक तरुण-तरुणींची पसंती ही आता इंस्टाग्रामला दिली जात आहे. अशावेळी इंस्टाग्राम आणि त्यावरील फॉलोवर्स हे तरुणांसाठी फारच महत्त्वाचे ठरत आहेत. यामुळे याबाबतची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी तरुणांचे प्रयत्न सुरु असतात. अशावेळी जर आपल्याला कोण अनफॉलो करतंय हे समजलं तर ती त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट ठरु शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी