World Emoji Day 2021: 'वर्ल्ड इमोजी डे' निमित्त जाणून घ्या इमोजींचे महत्त्व आणि इतिहास

आज १७ जुलै २०२१. दरवर्षी १७ जुलैला 'वर्ल्ड इमोजी डे' अर्थात जागतिक इमोजी दिन किंवा आंतरराष्ट्रीय इमोजी दिन साजरा करतात. या दिवसाची सुरुवात २०१४ पासून झाली. पहिला 'वर्ल्ड इमोजी डे' १७ जुलै २०१४ रोजी साजरा झाला.

World Emoji Day, World Emoji Day 2021 Importance, History and quotes on emoji
World Emoji Day 2021: 'वर्ल्ड इमोजी डे' निमित्त जाणून घ्या इमोजींचे महत्त्व आणि इतिहास 

थोडं पण कामाचं

  • World Emoji Day 2021: 'वर्ल्ड इमोजी डे' निमित्त जाणून घ्या इमोजींचे महत्त्व आणि इतिहास
  • शब्द आणि भावनांपेक्षा प्रभावी तसेच वेगवान आहेत इमोजी
  • इमोजी हा एक जापनीज (जपानी) भाषेतील शब्द

नवी दिल्ली : World Emoji Day 2021: आज १७ जुलै २०२१. दरवर्षी १७ जुलै रोजी 'वर्ल्ड इमोजी डे' अर्थात जागतिक इमोजी दिन किंवा आंतरराष्ट्रीय इमोजी दिन साजरा करतात. या दिवसाची सुरुवात २०१४ पासून झाली. पहिला 'वर्ल्ड इमोजी डे' १७ जुलै २०१४ रोजी साजरा झाला. World Emoji Day, World Emoji Day 2021 Importance, History and quotes on emoji

ऑस्ट्रेलियातील जेरेमी बर्ज यांनी 'वर्ल्ड इमोजी डे' साजरा करण्यास सुरुवात केली. आज इमोजींनी जगातील सर्व मेसेजिंग अॅप, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्यापून टाकले आहेत. चॅट, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, सगळीकडे इमोजी दिसू लागले आहेत. व्यक्त होण्याच्या बाबतीत इमोजी हे शब्द आणि भावनांपेक्षा प्रभावी आहेत. इमोजींमुळे व्यक्त होणे अतिशय वेगवान झाले आहे. यामुळेच इमोजी वेगाने लोकप्रिय होत आहेत.

इमोजी हा एक जापनीज (जपानी) भाषेतील शब्द आहे. इ म्हणजे चित्र (पिक्चर) आणि मोजी म्हणजे पात्र यांच्या एकत्रिकरणातून इमोजी हा शब्द तयार झाला आहे. ताज्या पाहणीनुसार भारतात डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत असल्याचा इमोजी आणि 'ब्लोइंग अ किस' या दोन इमोजींचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहेत. हसणाऱ्या चेहऱ्याचा इमोजी (स्मायली) हा जगात सर्वाधिक वापरला जातो. भारतातही हा इमोजी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. आधीच्या एका पाहणीत भारतातही हसणाऱ्या चेहऱ्याचा इमोजी सर्वाधिक वापरला जात असल्याचे आढळले होते. अमेरिकेतील रोस बॉल यांनी हसणाऱ्या चेहऱ्याचा इमोजी (स्मायली) तयार केला आहे.

असे सांगतात की, जपानमध्ये ९०च्या दशकात इमोजीचा वापर सुरू झाला. पुढे मोबाइल आणि सोशल मीडिया यामुळे इमोजी वेगाने लोकप्रिय झाले. स्मार्टफोन आणि सोशल मीडिया अॅप यांच्यामुळे २०१० पासून इमोजीच्या लोकप्रियतेत वाढ झाली. वेबसाइट, अॅप यांच्यासह अनेक डिजिटल माध्यमांमध्ये ठिकठिकाणी इमोजींचा वापर सुरू झाला.

इमोजी डे स्पेशल कोट्स - 

  1. शब्द आणि भावनांपेक्षा प्रभावी तसेच वेगवान आहेत इमोजी Happy World Emoji Day
  2. जिथे शब्द कमी पडतात तिथे इमोजी प्रभावी ठरतात Happy World Emoji Day
  3. जग इमोजींशिवाय अपूर्ण आहे Happy World Emoji Day
  4. मानवी भावना व्यक्त करण्याचे इमोजी प्रभावी माध्यम आहे Happy World Emoji Day
  5. इमोजींमुळे संवाद साधणे सोपे झाले Happy World Emoji Day
  6. एक इमोजी बरचं काही सांगून जातो Happy World Emoji Day
  7. इमोजींशिवाय सोशल मीडिया अपूर्ण आहे Happy World Emoji Day

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी