Instagram New Features वेबसाइटवर एम्बेड करता येणार इन्स्टाग्राम प्रोफाइल

You Can Now Embed Instagram Profiles To Websites and Reply To Comments With Reels : फोटो शेअर करण्यासाठी वापरला जाणारा लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'इन्स्टाग्राम'ने एक नवे फीचर लाँच केले. या फीचरमुळे वेबसाइटवर 'इन्स्टाग्राम प्रोफाइल' एम्बेड करता येईल.

You Can Now Embed Instagram Profiles To Websites and Reply To Comments With Reels
वेबसाइटवर एम्बेड करता येणार इन्स्टाग्राम प्रोफाइल 
थोडं पण कामाचं
  • वेबसाइटवर एम्बेड करता येणार इन्स्टाग्राम प्रोफाइल
  • 'इन्स्टाग्राम स्टोरीज' आणि 'रील्स' साठी प्लेबॅक फीचर
  • रील्स, व्हिज्युअल रिप्लाय फीचरद्वारे ६० सेकंदात पोस्टला आणि व्हिडीओला रिप्लाय देण्याचा पर्याय

You Can Now Embed Instagram Profiles To Websites and Reply To Comments With Reels : नवी दिल्ली : फोटो शेअर करण्यासाठी वापरला जाणारा लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'इन्स्टाग्राम'ने एक नवे फीचर लाँच केले. या फीचरमुळे वेबसाइटवर 'इन्स्टाग्राम प्रोफाइल' एम्बेड करता येईल. यामुळे एखाद्या व्यक्तीची ओळख सांगण्यासाठी थेट त्याचे 'इन्स्टाग्राम प्रोफाइल' एम्बेड करणे शक्य होईल.

'इन्स्टाग्राम'ने काही दिवसांपूर्वी 'इन्स्टाग्राम स्टोरीज' आणि 'रील्स' साठी प्लेबॅक फीचर लाँच केले. प्लेबॅक व्हिडिओमध्ये, युझर २०२१ या वर्षातील टॉप टेन स्टोरीज आणि पोस्ट यांचा व्हिडीओ तयार करू शकतो. हा व्हिडीओ एडिट करता येईल. तसेच युझर २०२१ मधील त्याच्या स्टोरीज पूर्णपणे काढून टाकू शकतो. तसेच निवडक फोटो-व्हिडीओ यांच्या मदतीने नव्या स्टोरीज तयार करू शकतात. 

'इन्स्टाग्राम प्रोफाइल' एम्बेड हा पर्याय अमेरिकेतील युझरना उपलब्ध आहे. लवकरच इतर देशांतील युझरनाही हा पर्याय मिळेल. तसेच रील्स, व्हिज्युअल रिप्लाय फीचरद्वारे ६० सेकंदात पोस्टला आणि व्हिडीओला रिप्लाय देण्याचा पर्याय खुला करण्यात आला आहे. याआधी रिप्लायसाठी फक्त टेक्स्ट हाच पर्याय उपलब्ध होता. आता तर स्टिकर्सद्वारेही रिप्लाय देता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी