अवघड सोपे झाले हो.. WhatsApp वर काढा मेट्रोचे तिकिट!

WhatsApp Metro Tickets: मेट्रोचं तिकीट आता आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर देखील काढता येणार आहे. जाणून घ्या याची नेमकी प्रक्रिया काय आहे.

you will be able to buy metro tickets on whatsapp card will also be recharged new service started
अवघड सोपे झाले हो.. WhatsApp वर काढा मेट्रोचे तिकिट!  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • WhatsApp वर काढा मेट्रोचे तिकिट
 • जाणून घ्या याची नेमकी प्रक्रिया काय
 • ही सेवा बंगळुरूमध्ये सुरू झाली आहे

Metro Tickets: बंगळुरु: WhatsApp हे आता काही इन्स्टंट मेसेजिंग App राहिलेले नाही. यामध्ये अनेक फीचर्स आहेत जे फारच उपयुक्त आहेत. तसंच आणखी एक फीचर WhatsApp घेऊन आलं आहे. ते म्हणजे मेट्रो तिकिट. यापुढे मेट्रो तिकिट खरेदी करण्यासाठी आपण WhatsApp चाही  वापर करू शकता. सध्या ही सेवा बंगळुरूमध्ये सुरू झाली आहे. जिथे तुम्ही WhatsApp वर मेट्रोचं तिकिट काढूच शकता पण त्याशिवाय  मेट्रोचं कार्ड देखील  रिचार्ज करू शकता. (you will be able to buy metro tickets on whatsapp card will also be recharged new service started)

WhatsApp ची सुरुवात इन्स्टंट मेसेजिंग App म्हणून झाली होती. मात्र यामध्ये हळूहळू नवनवीन फीचर्स आले. आता तुम्ही WhatsApp मध्ये ऑडिओ, व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप कॉलिंग आणि आता पेमेंट फीचर देखील वापरू शकता. अलीकडेच या अ‍ॅपमध्ये एक नवीन फीचर जोडण्यात आले आहे. त्याच्या मदतीने तुम्ही मेट्रो तिकिट खरेदी करू शकता आणि तुमचे कार्ड रिचार्ज देखील करू शकता.

अधिक वाचा: Google: गुगलने यूजर्संना दिलं प्रचंड मोठं गिफ्ट!

वास्तविक, WhatsApp आणि बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) यांनी याबबातची घोषणा केली आहे. या भागीदारीअंतर्गत,  Namma Metro ची व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट आधारित QR तिकीट सेवा सुरू करण्यात आली आहे. चॅटबॉट UPI ने इंटीग्रेटेड आहे.

यूपीआयच्या मदतीने  Namma Metro चे यूजर्स हे ऑनलाइन तिकिट खरेदी करू शकतात. यासाठी त्यांना रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. या चॅटबॉटच्या मदतीने यूजर्स अगदी झटपट मेट्रो तिकिट काढू शकतात. 

बीएमआरसीएलच्या मते, ही पहिली ट्रांझिट सेवा आहे जी एंड-टू-एंड क्यूआर तिकिटिंगसह येते. याबाबत महामंडळाने सांगितले की, त्यांचा चॅटबॉट इंग्रजी आणि कन्नड या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.
 

अधिक वाचा: Twitter: ट्विटरवर 'ब्लू टिक' हवी आहे? महिन्याला मोजावे लागतील इतके पैसे; मस्क यांचा निर्णय

WhatsApp वर नेमकं तिकिट कसं काढाल?

 1. तुम्ही ही सेवा इतर कोणत्याही WhatsApp चॅटबॉट सेवेप्रमाणे वापरू शकता. 
 2. यासाठी तुम्हाला BMRCL +91 8105556677 च्या अधिकृत WhatsApp चॅटबॉट नंबरवर Hi पाठवावे लागेल. 
 3. येथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील.
 4. यूजर्स त्यांच्या गरजेनुसार रिचार्जिंग मेट्रो ट्रॅव्हल पास खरेदी करू शकतात.
 5. याशिवाय यूजर्स सिंगल तिकीटही खरेदी करू शकतात. 
 6. तिकिटासाठी तुम्हाला WhatsApp वरुनच पैसे मोजावे लागणार आहेत. 
 7. पेमेंट करण्यासाठी यूजर्सला व्हॉट्सअ‍ॅप बंद करण्याची देखील गरज पडणार नाही.  
 8. आपल्या प्रवासाचा तपशील निश्चित केल्यानंतर यूजर्सला पेमेंटचा पर्याय मिळेल. 
 9. येथे ते WhatsApp पे निवडू शकतात. 

   

काही दिवसांपूर्वीच मुंबई मेट्रोनेही व्हॉट्सअ‍ॅप सेवेवर ई-तिकीट सुरू केले आहे. त्यामुळे असंच म्हणता येईल की, आता मेट्रोने अवघडही सेोपं केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी