YouTube बंद होणार, कंपनीने केली घोषणा

Youtube Go Light Weight App Will Be Shut Down From August : यू ट्युब या लोकप्रिय व्हिडीओ प्लॅटफॉर्म कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी यू ट्युब गो हे अॅप कायमचे बंद करणार आहे. यू ट्युब गो अॅपला कंपनीकडून ऑगस्ट २०२२ पर्यंत टेक सपोर्ट मिळेल. नंतर अॅप कायमचे बंद होईल. 

Youtube Go Light Weight App Will Be Shut Down From August
YouTube बंद होणार, कंपनीने केली घोषणा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • YouTube बंद होणार, कंपनीने केली घोषणा
  • यू ट्युब गो हे अॅप कायमचे बंद करणार
  • यू ट्युब गो अॅपला कंपनीकडून ऑगस्ट २०२२ पर्यंत टेक सपोर्ट मिळेल

Youtube Go Light Weight App Will Be Shut Down From August : यू ट्युब या लोकप्रिय व्हिडीओ प्लॅटफॉर्म कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी यू ट्युब गो हे अॅप कायमचे बंद करणार आहे. यू ट्युब गो अॅपला कंपनीकडून ऑगस्ट २०२२ पर्यंत टेक सपोर्ट मिळेल. नंतर अॅप कायमचे बंद होईल. 

भारतात फोर जी इंटरनेट सेवा उपलब्ध आहे. देशात फाइव्ह जी इंटरनेट सेवा लवकरच लाँच होणार आहे. दररोज किमान एक जीबी डेटा पॅक अनेक सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या पुरवू लागल्या आहेत. भारतात २ जीबी रॅम असलेले अनेक मोबाइल उपलब्ध आहेत. यामुळे यू ट्युब गो या यू ट्युबच्या लाइट अॅपची आवश्यकता संपली आहे. याच कारणामुळे यू ट्युब कंपनीने यू ट्युब गो हे अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

काही वर्षांपूर्वी पर्यंत भारतात अनेकांना टू जी किंवा थ्री जी इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत होती. इंटरनेट पॅक महाग होती. यामुळे लोकांचा कल मर्यादीत इंटरनेट वापरण्याकडे होता. ही बाब लक्षात घेऊन यू ट्युब कंपनीने भारतीयांसाठी यू ट्युब लाइट हे अॅप लाँच केले होते. यात मर्यादीत इंटरनेट कनेक्टिव्हिटीत यू ट्युब सेवा मिळत होती. आता परिस्थिती बदलली असल्यामुळे यू ट्युब कंपनीने यू ट्युब गो हे लाइट अॅप बंद करण्याची तयारी सुरू केली आहे. 

काळ बदलला आहे. काळानुसार बदलणे आवश्यक आहे. याच कारणामुळे यू ट्युब गो बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. यू ट्युब गो बंद करण्याची हीच योग्य वेळ आहे; असे कंपनीचे म्हणणे आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी