YouTube मध्ये Q&A फीचर, युझरना होणार फायदा

YouTube rolls out Live Q&A feature for live creators : यू ट्युब या व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर नवे लाइव्ह प्रश्नोत्तरांचे अर्थात Q&A फीचर लाँच झाले.

YouTube rolls out Live Q&A feature for live creators
YouTube मध्ये Q&A फीचर, युझरना होणार फायदा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • YouTube मध्ये Q&A फीचर, युझरना होणार फायदा
  • यू ट्युबवर लाइव्ह व्हिडीओ स्ट्रीम करताना प्रेक्षकांशी संवाद साधणे सोपे होणार
  • लाइव्ह व्हिडीओ स्ट्रीम सुरू असताना लाइव्ह पोल घेण्याचा पर्याय आधीपासून आहे

YouTube rolls out Live Q&A feature for live creators : यू ट्युब या व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर नवे लाइव्ह प्रश्नोत्तरांचे अर्थात Q&A फीचर लाँच झाले. या क्वेश्चन अँड आन्सर फीचरमुळे जे युझर यू ट्युबवर लाइव्ह व्हिडीओ स्ट्रीम करतात त्यांना थेट प्रेक्षकांशी संवाद साधणे सोपे होणार आहे. नवे फीचर यू ट्युबच्या लाइव्ह व्हिडीओ स्ट्रीमला आणखी इंटरअॅक्टिव्ह (संवादाभिमुख / संवादात्मक) करणार आहे. 

लाइव्ह व्हिडीओ स्ट्रीम सुरू असताना लाइव्ह पोल घेण्याचा पर्याय आधीच उपलब्ध करण्यात आला आहे. आता लाइव्ह व्हिडीओ स्ट्रीम सुरू असताना लाइव्ह प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधणेही शक्य होणार आहे.

ATM कार्ड विसरलात? काळजी करू नका! स्मार्टफोनच्या मदतीने काढा एटीएममधून पैसे

VIDEO: भरमसाठ वीज बिलामुळे त्रस्त? मग या 5 गोष्टी करुन पाहाच...

यू ट्युबच्या नव्या फीचरमुळे लाइव्ह व्हिडीओ स्ट्रीम करणाऱ्यांना प्रेक्षकांचे विचार जाणून घेणे आणि त्यांच्याशी थेट संवाद साधणे सोपे होणार आहे. नव्या फीचरमुळे यू ट्युबच्या लाइव्ह व्हिडीओ या पर्यायाची लोकप्रियता वाढण्यास मदत होणार आहे.

Q&A फीचरमध्ये यू ट्युबने काही वैशिष्ट्यपूर्ण पर्याय लाइव्ह व्हिडीओ स्ट्रीम करणाऱ्या युझरला उपलब्ध करून दिले आहेत. या पर्यायांमुळे व्हिडीओ स्ट्रीम करणारा आलेल्या प्रश्नांपैकी आक्षेपार्ह वाटणारा प्रश्न सेन्सॉर करू शकेल. यामुळे तो प्रश्न प्रेक्षकांना दिसणार नाही. तसेच प्रश्नातील विशिष्ट शब्द सेन्सॉर करण्याचा पर्याय व्हिडीओ स्ट्रीम करणाऱ्याकडे असेल. या पर्यायांमुळे आक्षेपार्ह भाषेच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

यू ट्युबच्या Q&A फीचरचा वापर करून लाइव्ह स्ट्रीम सुरू असताना प्रेक्षक असंख्य प्रश्न विचारू शकतात. यापैकी लेटेस्ट 200 प्रश्न लाइव्ह स्ट्रीम बघत असलेल्यांना दिसतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी