Google Search: गुगलवर शोधा 'हे' शब्द आणि पहा मस्त जादू

टेक इट Easy
रोहित गोळे
Updated Oct 18, 2022 | 19:17 IST

Google Search Diwali 2022: भारतात यंदा दिवाळी 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. याच दरम्यान, गुगलनेही आपल्या यूजर्सना सरप्राइज दिलं आहे. चला तर जाणून घेऊया त्याबद्दल.

google starts diwali celebration search on diwali word and you can get a surprise
Google Search: गुगलवर शोधा 'हे' शब्द आणि पहा मस्त जादू  
थोडं पण कामाचं
  • दिवाळी सणाला 23 ऑक्टोबरपासून सुरुवात
  • दिवाळीसाठी गुगलने आणलं खास सरप्राइज
  • दिवाळीनिमित्त गुगलने तयार केलं मस्त अ‍ॅनिमेशन

Diwali 2022: दिवाळी सणाला आता अवघा एक आठवडा उरला आहे. दिवाळी सणासाठी बाजारपेठा देखील सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे आता हळूहळू दिवाळीचा रंग वातावरणात चढू लागला आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर देखील दिवाळीबाबत वेगवेगळे मेसेज, शुभेच्छा पाहायला मिळत आहे. अशावेळी आता गुगलनेही खास आपल्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली आहे. गुगलने भारतातील युजर्संना दिवाळीचे एक खास सरप्राईज दिले आहे. यासाठी यूजर्सना फक्त Google Search वर जाऊन Diwali टाइप करुन यूजर्संना सर्च करावे लागेल. (google starts diwali celebration search on diwali word and you can get a surprise)

Google India ने ट्विटमध्ये लिहिले आहे की, सरप्राईजसाठी दिवाळी सर्च करा. तुम्ही सर्च बॉक्समध्ये जाऊन दिवाळी (Diwali) असे टाइप करुन सर्च केल्यावर तुम्हाला दिवाळी सणाची संपूर्ण माहिती मिळेल. तसेच दिवाळीसोबत तुम्हाला एक दिवा देखील दिसेल. त्याच्या बाजूला तुम्हाला काही चमकणारे तारेही दिसतील.

अधिक वाचा: google च्या मदतीने शिकली बनावट ई-तिकीटांची टेक्निक, लाॅकडाऊननंतंर विकली तब्बल २५ लाखांची रेल्वेची तात्काळ तिकिट

मग तुम्ही दिव्यावर क्लिक करताच, तो दिवा पेटेल आणि तुमच्या माऊसने तो नियंत्रित करता येईल. यासोबत तुम्हाला आणखी 8 दिवे दिसतील. तुम्ही त्यांच्याकडे कर्सर नेल्यानंतर, हे बाकीचे दिवे देखील पेटतील आणि तुमची स्क्रीन पूर्णपणे उजळेल.

तुम्ही Diwali 2022 लिहून सर्च केलेत तरी तुम्हाला अशीच स्क्रीन पाहायला मिळेल. कॉम्प्युटर व्यतिरिक्त तुम्ही हे अ‍ॅनिमेशन फोनवर देखील पाहू शकता. तसेच, ते iOS आणि Android या दोन्ही डिव्हाइसमध्ये देखील तुम्हाला हे अ‍ॅनिमेशन पाहता येईल. फोनमध्ये यूजर्संना टचद्वारे दिवे मूव्ह करावे लागतील. एकदा सर्व दिवे पेटले की, स्क्रीन आपोआप उजळून निघेल.

अधिक वाचा: Google Bans Apps: गुगलचा मोठा निर्णय! Play Store वरून हटवले हे ॲप्स

यंदा भारतात दिवाळी रविवार, 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. त्यासाठी बाजारपेठा सजल्या असून फटाक्यांची सुद्धा विक्री सुरू झाली आहे. तसेच बाहेरगावी राहणाऱ्या लोकांनीही घरी जाण्यासाठी तिकिटे काढली आहेत. त्यामुळे आता प्रत्येकाला दिवाळी सणाची उत्सुकता लागून राहिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी