ISRO ने पुन्हा रचला इतिहास; PSLV C50च्या माध्यमातून CMS01 उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

टेक इट Easy
Updated Dec 17, 2020 | 16:55 IST

PSLV C50 lifts off successfully from Sriharikota: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आज आपल्या सीएमएस 01 (CMS01) या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे.

थोडं पण कामाचं
  • इस्रोकडून पीएसएलव्ही-सी50 च्या माध्यमातून सीएमएस 01 (CMS01) उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 
  • कोरोना काळात इस्रोने यशस्वी केली दुसरी मोहिम, यापूर्वी 7 नोव्हेंबर 2020 रोजी इस्रोने आपल्या अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईटचे केले होते यशस्वी प्रक्षेपण
  • आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन या स्पेस सेंटरवरुन CMS01चे प्रक्षेपण

श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच इस्रोने अंतराळ क्षेत्रात पुन्हा एकदा महत्वाची कामगिरी करत आणखी एक इतिहास रचला आहे. इस्रोने गुरुवारी पीएसएलव्ही-सी50 (PSLV C50)च्या माध्यमातून कम्यूनिकेशन सॅटेलाईट सीएसएस-01 (CMS01)चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. कोरोना काळातील इस्रोची ही एक दुसरी मोहीम आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन या स्पेस सेंटरवरुन दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी सीएसएस-01 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.

पीएसएलव्हीचे हे 52वे मिशन आहे. सीएसएस-01 (CMS01) हे इस्रोचं 42वं कम्यूनिकेशन सॅटेलाईट आहे. हे सॅटेलाईट भारतीय जमिनीसोबतच अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप बेटांना विस्तारीत सी-बँड सेवा उपलब्ध करुन देणार आहे. यापूर्वी 7 नोव्हेंबर 2020 रोजी इस्रोने 'अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट' EOS-01चे यशस्वी प्रक्षेपण केले होते ज्याच्याद्वारे कुठल्याही वेळी आणि कुठल्याही वातावरणात पृथ्वीवर लक्ष ठेवून स्पष्ट चित्रे टिपले जाऊ शकते.

सीएसएस-01 (CMS01) उपग्रहामुळे दूरसंचार सेवा सुधारण्यास मदत होणार आहे. यासोबतच टीव्ही वाहिन्यांच्या चित्रांची गुणवत्ता म्हणजेच पिक्चर क्वॉलिटी सुधारण्यास मदत होईल तसेच आपत्ती व्यवस्थानाच्या दरम्यानही सरकारला याची मदत होणार आहे. हा उपग्रह 2011मध्ये प्रक्षेपित केलेल्या जीसॅट-2 टेलिकम्युनिकेशन उपग्रहाची जागा घेणार आहे. सीएसएस-01 हा उपग्रह पुढील सात वर्षांसाठी सेवा देईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी