WhatsApp वर तुम्हालाही मेसेज किंवा कॉल्स येतायत? मग व्हा सावध, जाणून घ्या कसा करावा नंबर ब्लॉक आणि कसे कराल रिपोर्ट

सध्याच्या काळात स्मार्टफोन युजर्सपैकी जवळपास सर्वचजण हे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करताना दिसून येतात. मात्र, याच व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करुन आता स्कॅमर्स नागरिकांना गंडा घालत असल्याच्या घटना समोर येताना दिसत आहेत. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

Updated May 8, 2023 | 02:34 PM IST

WhatsApp वर तुम्हालाही मेसेज किंवा कॉल्स येतायत? मग व्हा सावध, जाणून घ्या कसा करावा नंबर ब्लॉक आणि कसे कराल रिपोर्ट
Fake Call and message on WhatsApp : व्हटॉट्सअ‍ॅप युजर्सकडून स्कॅम कॉल्सच्या तक्रारीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अनेक युजर्सला आंतरराष्ट्रीय नंबरवरुन फेक कॉल्स येत आहेत. या फेक कॉल्सपासून सुरक्षित राहण्याचा एक पर्याय म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप अज्ञात आणि आंतरराष्ट्रीय नंबरवरुन कॉल आल्यास उचलू नका.
तुम्हालाही आंतरराष्ट्रीय नंबर्सवरुन व्हॉट्सअ‍ॅप कॉल किंवा मेसेज येत आहेत का? येत असतील तर सावध व्हा... कारण अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत आणि याच माध्यमातून स्कॅमर्स हे नागरिकांची आर्थिक फसवणूक तसेच ब्लॅकमेलिंग करत असल्याचं उघड झालं आहे.

कोणत्या नंबर्सवरुन येत आहेत कॉल्स?

स्कॅमर्सकडून व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे फोन कॉल्स हे आंतरराष्ट्रीय नंबर्सवरुन येत आहेत. यामध्ये विविध देशांतील नंबर्सचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. पाहूयात कोणत्या नंबर्सवरुन हे फोन कॉल्स येत आहेत. इथियोपिया (+251), मलेशिया (+60), इंडोनेशिया (+62), केनिया (+254), विएतनाम (+84) या देशांमधून आंतरराष्ट्रीय नंबर्सवरुन फोन कॉल्स येत आहेत.

सुरक्षेसाठी काय करावे?

अशा प्रकारच्या फेक कॉल्सपासून स्वत:चा बचाव करण्याचा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे अज्ञात क्रमांकावरुन व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल आल्यास उचलू नका. हा मुख्य नियम व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल्स या दोन्हीसाठी लागू आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा नंबर्सला तात्काळ ब्लॉक करुन रिपोर्ट करणे आवश्यक आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्स हे नंबर्स ब्लॉक करु शकतात आणि त्यासोबतच व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून रिपोर्ट सुद्धा करु शकतात.

एखाद्या नंबरला कसे कराल ब्लॉक?

व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्या नंबरला ब्लॉक करायचं असेल तर त्यासाठी युजरला कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जावं लागेल. त्यानंतर More > Block > Block वर टॅप करा. युजर अ‍ॅप ओपन करुन आणि ऑप्शन > सेटिंग्स > प्रायव्हसी > ब्लॉक कॉन्टॅक्टवर टॅप करुन आपण ब्लॉक केलेल्या लिस्टपर्यंत पोहोचू शकतात. युजरला ज्या नंबरला ब्लॉक करायचं आहे तो नंबर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये शोधून सुद्धा ब्लॉक करता येऊ सकते.

रिपोर्ट कसे कराल?

व्हॉट्सअ‍ॅपवर अज्ञात क्रमांकावरुन मेसेज, कॉल आल्यास त्या संदर्भात रिपोर्ट करण्यासाठी Report Contact> यावर क्लिक करा यामुळे तो नंबर ब्लॉक होईल आणि त्यासोबतच त्याच्या संदर्भात रिपोर्ट सुद्धा देता येईल.
ताज्या बातम्या

Virel Video: बापरे! मुलीने दुकानातून असा पकडला साप, व्हिडिओ पाहून लोकं काय म्हणाले पाहा..

Virel Video

Viral Video : मुलीने दुकानातून असा पकडला साप, व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक विचारत आहेत...

Viral Video

Google Search : यांचं काहीतरी भलतंच! मुली रात्री बंद खोलीत Google वर काय शोधतात? तुम्हीही व्हाल हैराण-परेशान

Google Search         Google      -

Daily Horoscope 26 September: या राशीच्या लोकांना मिळणार प्रचंड यश , येथे जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Daily Horoscope 26 September

Bank Account Closing Fee: सेव्हिंग अकाउंट बंद करण्यासाठी भरावी लागेल क्लोजिंग फी, किती आहे शुल्क?

Bank Account Closing Fee

Viral News : अजब! नदीत बुडणाऱ्या कुत्र्याला मगरींनी वाचवले; सोशल मीडियावर झालाय कल्ला

Viral News

Crime News : संतापजनक! 'कुठं फेडाल हे पाप' त्यांनी आईसमोरच पोटच्या मुलीवर केला सामुहिक बलात्कार आणि...

Crime News

Viral Video: वांद्रे सी लिंकवर महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, पोलिसासोबत गैरवर्तन करत दिली ही धमकी

Viral Video
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited