LPG Booking Via WhatsApp-आता WhatsApp ने सुद्धा बुक करू शकता LPG सिलिंडर, जाणून घ्या कसे

LPG Gas booking via WhatsApp : प्रत्येक घरात जेवण बनवण्यासाठी गॅस सिलिंडर ची गरज असते. पूर्वीच्या काळात चूलीवर जेवण बनत असल्याकारणामुळे गॅस सिलिंडर ची इतकी गरज नसायची. मात्र वाढते शहरीकरणामुळे गावागावात गॅस सिलिंडर पोहोचले. शिवाय घासलेटवर चालणारी पारंपरिक शेगडी देखील आता कुठे दिसून येत नाही. गॅस सिलिंडर ची मागणी मोठ्या प्रमाणात असून, याचे आगाऊ बुकिंग करणे महत्वाचे झाले आहे. अशावेळी LPG सिलिंडर चे बुकिंग काही वेळा जिकिरीचे काम बनते. अनेक वेळा सिलिंडर बूक होतच नाही. मात्र आता हे WhatsApp द्वारे शक्य होणार आहे.

Updated Apr 26, 2023 | 04:23 PM IST

LPG Cylinder Booking via WhatsApp

WhatsApp द्वारे गॅस सिलिंडर बूक कसे करावे हे जाणून घ्या

LPG Booking Via WhatsApp: एलपीजी गॅस सिलेंडरची बुकिंग करणे पूर्वी खूप कठीण काम होते. त्यानंतर हळूहळू टोल-फ्री नंबरवरून बुकिंग प्रक्रिया सुरू झाली, आणि आता आपल्या ग्राहकांसाठी ही बुकिंग प्रक्रिया आणखीन सहज कंपनीने व्हॉट्सअपद्वारे एलपीजी गॅस सिलिंडर बुक करण्याची पद्धत सुरू केली आहे. आत्तापर्यंत तुम्ही एजन्सीमध्ये जाऊन किंवा गॅस कंपनीने दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून गॅस बुक करत होता, अशा वेळी हा नंबर सतत बिझी असल्याकारणामुळे बुकिंग होत नाही, त्यामुळे आता एलपीजी बुकिंगचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. व्हॉट्सअपद्वारे सिलिंडरचा लोकांना खूप फायदा होत आहे. वेळेची बचतही होते आणि त्रासही कमी होतो. इंडेन, एचपी आणि भारत गॅस सिलिंडरचे ग्राहक व्हॉट्सअपद्वारे कसे बुक करू शकतात याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

How to Book Indane Gas Cylinder via WhatsApp : व्हॉट्सअपद्वारे इंडेन गॅस सिलिंडर कसे बुक करावे?

  • तुम्ही ज्या क्रमांकावरून गॅस बुक करत आहात तोच क्रमांक असायला हवा.
  • आता सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये 7588888824 हा नंबर सेव्ह करा.
  • आता हा नंबर WhatsApp वर ओपन करा.
  • यामध्ये तुम्हाला फक्त REFILL लिहून पाठवावे लागेल आणि बुकिंग होईल.
  • तुम्ही 7718955555 वर कॉल करून तुमचा एलपीजी सिलेंडर बुक करू शकता.

How to Book HP Gas Cylinder through WhatsApp: व्हॉट्सअपद्वारे एचपी गॅस सिलिंडर कसे बुक करावे?

  • येथे तुम्ही ज्या व्हॉट्सअप क्रमांकावरून मेसेज पाठवणार आहात त्याची नोंदणी करणेही बंधनकारक आहे.
  • आता HP चा WhatsApp नंबर 9222201122 तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा
  • आता हा नंबर WhatsApp वर उघडा आणि BOOK लिहून पाठवा.
  • बुकिंग दरम्यान तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, त्यांची उत्तरे द्या.
  • या नंबरवर, तुम्हाला एलपीजी कोटा, एलपीजी आयडी, सबसिडी इत्यादींबद्दल माहिती देखील मिळू शकेल.

How to Book Bharat Gas Cylinder through WhatsApp: व्हॉट्सअपद्वारे भारत गॅस सिलेंडर कसे बुक करावे?
  • तुमच्या फोनमध्ये भारत गॅस बुकिंग व्हॉट्सअप नंबर 1800224344 सेव्ह करा.
  • आता WhatsApp वर जा आणि ते उघडा.
  • त्यावर हाय लिहून मेसेज करा.
  • त्या बदल्यात तुम्हाला लगेच एक मेसेज मिळेल, ज्यामध्ये भारत गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी तुम्हाला तो “1” किंवा “BOOK” टाइप करून पाठवण्यास सांगितले जाईल.
  • आता तुम्ही “1” किंवा “बुक” पाठवा आणि प्रक्रिया पूर्ण होईल.
ताज्या बातम्या

Virel Video: बापरे! मुलीने दुकानातून असा पकडला साप, व्हिडिओ पाहून लोकं काय म्हणाले पाहा..

Virel Video

Viral Video : मुलीने दुकानातून असा पकडला साप, व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक विचारत आहेत...

Viral Video

Google Search : यांचं काहीतरी भलतंच! मुली रात्री बंद खोलीत Google वर काय शोधतात? तुम्हीही व्हाल हैराण-परेशान

Google Search         Google      -

Daily Horoscope 26 September: या राशीच्या लोकांना मिळणार प्रचंड यश , येथे जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Daily Horoscope 26 September

Bank Account Closing Fee: सेव्हिंग अकाउंट बंद करण्यासाठी भरावी लागेल क्लोजिंग फी, किती आहे शुल्क?

Bank Account Closing Fee

Viral News : अजब! नदीत बुडणाऱ्या कुत्र्याला मगरींनी वाचवले; सोशल मीडियावर झालाय कल्ला

Viral News

Crime News : संतापजनक! 'कुठं फेडाल हे पाप' त्यांनी आईसमोरच पोटच्या मुलीवर केला सामुहिक बलात्कार आणि...

Crime News

Viral Video: वांद्रे सी लिंकवर महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, पोलिसासोबत गैरवर्तन करत दिली ही धमकी

Viral Video
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited