comscore

IND vs SA LIVE score, 1st Test Day-1: टीम इंडियाची सेन्चुरी, रोहित-मयंक मैदानावर

India vs South Africa 1st Test Day 1 LIVE: भारत आणि अतिथी दक्षिण आफ्रिके या दोन्ही टीममध्ये आज टेस्ट सीरिजचा पहिला सामना सुरू होत आहे. या सामन्याचे स्कोअर आणि सर्व अपडेट्स जाणून घ्या. 

विशाखापट्ट्णम INDIA vs SOUTH AFRICA 1st Test Day 1 LIVE: आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेत तीन टेस्ट सामन्याच्या सीरिजमधला पहिला सामना खेळला जत आहे. विशाखापट्ट्णमच्या एसीए-व्हीडीसीए स्टेडिअमवर हा सामना रंगताना दिसेल. टीम इंडिया सध्या आयसीसी टेस्ट टीम रॅकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिकेची टीम तिसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाचं नेतृत्त्व कॅप्टन विराट कोहली तर दक्षिण आफ्रिकेच्या टीमचं नेतृत्त्व फाफ डु प्लेसिस करत आहेत. थोड्याच वेळात टॉस होईल. 

IND vs SA लाईव्ह अपडेट्सः 

 1. पाऊस पडल्यामुळे सामना थांबविण्यात आला 
 2. रोहित शर्माच्या करिअरमध्ये चौथा शतक पूर्ण 
 3. ५९.१ ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या २०२ धावा पूर्ण होऊन अंधुक प्रकाशामुळे सामना थांबविण्यात आला 
 4. शतक पूर्ण करून रोहितने लगावले 1२ चौके, ५ सिक्स आणि आताचा रनरेट ३.८३
 5. १५४ चेंडूत रोहित शर्माचे शतक पूर्ण 
 6. ४८ ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या १५० धावा पूर्ण
 7. ४६ ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या १३९ धावा
 8. ४१ ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या १२५ धावा
 9. मयंक अग्रवालचे अर्धशतक पूर्ण 
 10. टीम इंडियाचे शतक पूर्ण 
 11. मयंक अग्रवाल-  ३९ धावा , ६ चौके , १ सिक्स आणि रोहित शर्मा- ५२ धावा, ५ चौके, २ सिक्स
 12. ३० ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या ९१ धावा पूर्ण 
 13. रोहित शर्माच्या ८४ चेंडूत ५२ धावा 
 14. रोहित शर्माचे अर्धशतक पूर्ण 
 15. 2८ ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या ९० धावा आणि ३.०३ रनरेट
 16. 27 ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या 84 धावा
 17. सामन्याला सुरूवात, रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल मैदानावर
 18. टीम इंडियानं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा घेतला निर्णय
 19. थोड्याच वेळात टॉस होणार


संभाव्य दोन्ही टीमः 

भारतीय क्रिकेट टीमः विराट कोहली (कॅप्टन), मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, शुभमन गिल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव

दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम: फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), तेम्बा बावुमा, थ्युनिस डि ब्रुयिन, क्विंटन डि काक, एडन मार्कराम, सेनुरन मुथुसामी, लुंगी एनगिडी, एरिक नॉर्टजे, वरनोन फिलेंडर, डेन पीट, कागिसो रबादा, रूडी सेकेंड, डीन एल्गर, जुबैर हमजा आणि केशव महाराज

READ SOURCE