comscore

IPL 2020 साठी या महिन्यात होणार खेळाडूंचा लिलाव 

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या पुढील सीझनसाठी खेळाडूंचा लिलाव या वर्षी डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. फ्रेंचाइजी आतापासूनच दमदार खेळांडूंच्या शोधात लागली आहे. 

मुंबईः इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा 13वं सीझन पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये आयोजित करण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे की, यावेळी खेळाडूंच्या लिलावाचा कार्यक्रम लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. टूर्नामेंट सुरू होण्यासाठी भलेही अजून  सात महिने बाकी आहेत. मात्र फ्रेंचाइजीचे मालक आतापासूनच आयपीएल 2020 मध्ये आपली मजबूत टीम बनवण्यासाठी कामाला लागलेत. फ्रेंचाइजीजवळ यावर्षी डिसेंबरमध्ये आपली टीम जास्त मजबूत करण्यासाठी संधी असेल, जिथे पुढील सिझनसाठी खेळाडूंचा लिलाव होण्याची शक्यता आहे. 

एका रिपोर्टनुसार, डिसेंबरमध्ये छोटा लिलाव होईल, ज्यात खेळाडूंच्या सॅलेरी कॅपमध्ये 3 कोटी रूपयांची वाढ होईल. याचा अर्थ असा की, फ्रेंचाइजी आता 86 कोटी रूपयांपर्यतच खर्च करू शकणार आहे. बहुतेक टीम कमी-अधिक प्रमाणात स्थायी असताना कमकुवत टीम लिलावाला मोठी संधी मानतात. जिथे त्यांना चांगले खेळाडू मिळण्याची अपेक्षा असते. जर का खेळाडूंचा लिलाव डिसेंबरमध्ये झाला तर आपल्याला आयपीएल अधिकाऱ्यांकडून माहिती मिळू शकते की, फ्रेंचाइजी त्या खेळाडूंना कधी रिलीज करेल, ज्यांची त्यांना गरज नाही आहे. 

याच दरम्यान फ्रेंचाइजीमध्ये खेळाडूची देवाण-घेवाण जारी आहे. कारण यावर शंका निर्माण झाली आहे की, दिल्ली कॅपिटल्स पुढील सिझनमध्ये रविचंद्रन अश्विनला आपल्यासोबत जोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगलौर (आरसीबी) चं गेल्या सिझनमध्ये प्रदर्शन खूपच खराब होतं आणि याचमुळे फ्रेंचाइजी आपला सपोर्ट स्टाफ नवा बनवण्याच्या तयारीत आहे. 

आरसीबीनं क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालकाच्या रूपात माइक हेसन यांना नियुक्त केलं आहे. तसंच ऑस्ट्रेलियाचे कोच साइमन कॅटिच यांना टीमचं हेड कोच बनवलं आहे. शंकर बासू पुन्हा एकदा आरसीबीसोबत स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोचच्या रूपानं जोडले गेलेत. टीम इंडियाचे माजी क्रिकेटर श्रीधरण श्रीराम सुद्धा आरसीबीसोबत बॅटिंग आणि स्पिन बॉलिंगच्या रूपानं जोडले जाणार आहेत. 

आयपीएल 2019 मध्ये बरंच अॅक्शन बघायला मिळालं होतं. कारण 8 टीमनी 106.80 कोटी रूपये 60 खेळाडूंवर खर्च केले होते. 8.4 कोटी रूपयांमध्ये वरूण चक्रवर्ती आणि जयदेव उनाडकट संयुक्त रूपानं सर्वांत महागडे खेळाडू ठरले होते. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये खेळाडूंच्या लिलावाचा कार्यक्रम जयपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करन याला 7.2 कोटी रूपयांमध्ये विकत घेतला होता आणि तो सर्वांत महागडा विदेशी खेळाडू बनला होता.

READ SOURCE