Vijay Wadettiwar on Kolhapur: 'कोल्हापुरातला राडा शिंदे-फडणवीस सरकारचे षडयंत्र' वडेट्टीवारांची सरकारवर टीका

Salman Shaikh

Updated Jun 8, 2023 | 02:59 PM IST

चंद्रपूर: "कोल्हापुरात झालेला राडा सरकार पुरस्कृत आहे, यावर आम्ही ठाम आहोत. कुठल्याही दिशेने चौकशी केली तरी बोट सरकारकडे जाईल, हे खात्रीपूर्वक आम्ही सांगू शकतो" असे काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले आहे. "तीन चार महिन्यापासून या सरकारच्या पायाखालची वाळू घसरली आहे. सगळे जण आता सरकारच्या विरोधात आहेत. त्यामुळे राज्यात जातीय तेढ निर्माण करून सत्तेची पोळी भाजण्याचे कार्य सुरू आहे. त्याचा एक भाग कोल्हापुराचा राडा आहे." असेही वडेट्टीवार म्हणाले.

© 2023 Bennett, Coleman & Company Limited