Optical Illusion : या फोटोत लपले आहेत 10 प्राणी, 15 सेकंदात शोधणारा असेल ‘सुपर जिनियस’

या चित्रात एकूण 10 प्राणी लपले आहेत. ते जर तुम्ही ओळखू शकला तर तुम्ही जगाच्या लोकसंख्येपैकी निवडक 0.10 टक्क्यांमधील ठराल.

Optical Illusion
या फोटोत लपलेत 10 प्राणी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • फोटोत लपले आहेत 10 प्राणी
 • 15 सेकंद करा निरीक्षण
 • जगात खूपच कमी लोकांना दिसतात प्राणी

Optical Illusion : एखाद्या अस्फूट चित्राकडे पाहून त्यातील बारीकसारीक तपशील टिपण्याच्या क्षमतेवरून एखाद्या व्यक्तीच्या मेंदूची क्षमता तपासता येते, हे आजवर अनेकदा सिद्ध झालं आहे. खाली दिलेल्या फोटोमध्ये 10 प्राणी लपले आहेत. जगातील बहुतांश लोकांना ते ओळखता येत नाहीत, हे सिद्ध झालं आहे. ऑप्टिकल इल्युजन टेस्टला सामोरं जाणाऱ्या लोकांमधील निवडक 10 टक्के लोकांमध्ये तुमचा समावेश होऊ शकेल, जर तुम्ही या फोटोतील कमीत कमी 10 प्राणी ओळखू शकलात तर. या फोटोकडे केवळ 15 सेकंद बारकाईने पाहत राहा. हळूहळू एकेक प्राणी दिसायला सुरूवात होईल. 

फोटोचं करा निरीक्षण

या फोटोत एक ऑप्टिकल इल्युजन टेस्टचं चित्र रेखाटण्यात आलं आहे. हे चित्र आहे एका उजाड झालेल्या दृश्याचं. चित्र पाहून असं वाटतं की एखाद्या उजाड माळरानावर काही झाडं आणि गवत उगवलं आहे. हा फोटो पाहताना पहिल्या 15 सेकंदांत तुम्ही किती प्राणी पाहिले?२ तुम्हाला हा फोटो क्लिअर दिसतो आहे का? काहीजणांना या फोटोत दहा प्राणी दिसतात तर काहीजणांना अकरा प्राणी असल्याचंही आढळून येतं. अर्थात जगाच्या लोकसंख्येपैकी केवळ 0.1 टक्का नागरिकच या फोटोतील प्राणी ओळखू शकतात. अद्यापही तुम्हाला प्राणी ओळखता आले नसतील, तर आम्ही तुम्हाला मदत करतो.

अधिक वाचा - या Optical Illusion ने लोकांचं डोकं फिरवलं, तीक्ष्ण नजर असणारेही गोंधळले

हे आहेत प्राणी

या फोटोत असलेले प्राणी आहेत

 • पोपट
 • कोंबडा
 • लांडगा
 • हत्ती
 • घोडा
 • मगर
 • बदक
 • हरीण

या फोटोत एक माणूसदेखील दिसू शकेल. बारकाईने पाहा. दिसला का? हा माणूस डाव्या बाजूच्या झाडापाशी उभा आहे. वर उल्लेख केलेले सगळे प्राणी या फोटोत आहेत. तुम्ही हळूहळू एकेका प्राण्याचा शोध घेऊ शकता. प्राणी आणि पक्ष्यांचा शोध घेण्यासाठी फोटोतील झाडांचं बारकाईन निरीक्षण करा. वर उल्लेख केलेल्या प्रत्येक प्राण्याची प्रतिमा तुम्हाला या फोटोत दिसेल. काही प्राण्यांना या फोटोत बेडूकसुद्धा दिसतो.

अधिक वाचा - Optical Illusion: या फोटोत आहेत दोन Tiger, १५ सेकंदात पूर्ण करून दाखवा चॅलेंज

बारकाईने पाहा

या फोटोकडे अधिक बारकाईने पाहिलं तर त्यात पोपटदेखील दिसतो. पोपट झाडावर असणार हे साहजिक आहे. त्यामुळे पोपटाचा शोध तुम्ही सहज घेऊ शकाल. हत्ती आणि हरीण हे अगदी एकमेकांसमोर उभे आहेत. हत्ती आणि हरीण यांच्या पाठिमागे मगर बसलेला दिसतो. त्यांच्या वरच्या बाजूला तुम्हाला घोडा आणि हंसही दिसतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी