१०३ वर्षाच्या महिलेने केली कोरोनावर मात, बिअर पिऊन केला आनंदोत्सव!

व्हायरल झालं जी
Updated May 30, 2020 | 16:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

वयोवृद्ध असणाऱ्या जेनी स्टिजना नावाच्या १०३ वर्षांच्या महिलेला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता, दरम्यान या महिलेची कोरोना विषाणूची चाचणी केली असता, तिचा कोरोना विषाणूचा अहवाल सकारात्मक आला होता.

103-year-old woman overcame Corona, drank beer and celebrated!
१०३ वर्षाच्या वयोवृद्ध महिलेने केली कोरोनावर मात,थंडगार बिअर पिऊन केला आनंदोत्सव साजरा!  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • थंडगार बिअर पिऊन केला आनंदोत्सव साजरा
  • परिवारातील लोकांनी अंत्यविधीची तयारी केली होती.
  • कुटुंबाने तिच्या जगण्याची आशा सोडली होती

वॉश्गिंटन (अमेरिका): कोरोना विषाणूने जगात थैमान घातलं आहे. अगदी नवजात बालकापासून ते पुढे कितीही वर्षाच्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र एकदा कोरोनाची लागण झाली, तर त्यातून बाहेर पडणे हे मात्र फारच अवघड काम आहे. कारण सध्या तरी कोरोनावरती कुठलीच लस निघालेली नाही. त्यामुळे कोरोनाची भीती ही प्रत्येक व्यक्तीच्या मनात आहे. हेही तितकच खरं!

अमेरिकेत कोरोनामुळे एका लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

कोरोना साथीच्या आजाराचा सामना संपूर्ण जग करत आहे. ज्यामध्ये श्रीमंत असो की गरीब हे सर्वच लोक कोरोना विषाणूचा यातना भोगत असताना दिसत आहे. ज्यामध्ये अमेरिकासारखा बलाढ्य देश कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जगापेक्षा अधिक असुरक्षित मनाला जात आहे. जिथे संक्रमित लोकांची संख्या जवळपास लाखोंच्या घरात आहे. कोरोना विषाणूने १ लाख लोकांचा बळी घेतला असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच एका दैनिकाने प्रकाशित केले होते. मात्र, या संकटाच्या पार्श्वभूमीवर अशा काही घटना समोर येत आहेत, ज्यामुळे चेहऱ्यावर हास्यही येत आहे.

जेनी स्टीजना नावच्या १०३ वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण

दरम्यान, वयोवृद्ध असणाऱ्या जेनी स्टिजना नावाच्या १०३ वर्षांच्या महिलेला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता, या महिलेची कोरोना विषाणूची चाचणी केली असता, तिचा कोरोना विषाणूचा अहवाल सकारात्मक आला होता. सदर महिलेच्या वयानुसार आणि तिची प्रकृती पाहून, या वयातही ती कोरोनासारख्या महाभयंकर साथीच्या आजाराशी लढा देऊ शकेल अशी कोणालाही अपेक्षा वाटत नव्हती.

परिवारातील लोकांनी अंत्यविधीची तयारी केली होती.

जेनी स्टिजना या वयोवृद्ध असणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर परिवारातील लोकांना ती जगू शकणार नाही, असे वाटत होते. मात्र ,परंतु तसे झाले परिवारातील सदस्यांनी जेनी स्टिजनाच्या अंत्यविधीची तयारी केली असता, त्यांना एक सुखद बातमी मिळाली ती म्हणजे, जेनी स्टिजनाची प्रकृती आता व्यवस्थित आहे. ही बातमी ऐकून परिवारातील सदस्यांना मात्र आश्चर्याचा धक्काच बसला.

थंडगार बिअर पिऊन केला आनंदोत्सव साजरा

१०३ वर्षाच्या वयोवृद्ध महिलेने कोवीड-१९ वरती विजय मिळवल्यानंतर जेनी स्टीजनाने रुग्णालयातचं थंडगार बिअर पिऊन कोरोनासारख्या विषाणूवर मात केल्याचा आनंदोत्सव साजरा केला. जेव्हा ती या महाभयानक आजारातून बाहेर पडली तेव्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी तिला एक थंडगार बिअर आणून दिली जेणेकरुन ती हा खास क्षण साजरा करू शकेल.

कुटुंबाने तिच्या जगण्याची आशा सोडली

दरम्यान कुटुंबीयांतील सदस्यांनी  सांगितले की फायटर आजीच्या वयामुळे तिची प्रकृतीही ढासळत असल्याने कुटुंबाने तिच्या जगण्याची आशा सोडली, परंतु ती फारच धैर्यवान ठरली आणि कोरोनाचा पराभव केला.

भारतात एका महिन्याच्या मुलाने देखील केली कोरोनावर मात

दरम्यान एक दिसालादायक बातमी समोर आली होती,की एक महिन्याच्या मुलाने कोरोनावर मात केली असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात चिमुकल्याला घरी पाठवले.

भारत देशातील सर्वात कमी वयाचा रुग्ण


रिपोर्ट्सनुसार, कोरोनामुक्त होणारा हा देशातील सर्वात कमी वयाचा रुग्ण आहे. मुलाची आई मुलाला घेऊन जनरल वॉर्डमधून बाहेर आली तेव्हा तेथे उपस्थित रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला आणि टाळ्या वाजवून अभिवादन केले. यापूर्वी इंदूरमध्ये दोन महिन्यांच्या चिमुकलीने कोरोनावर मात केली होती.

मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीट केला व्हिडिओ

सीएम ऑफिसने मुलाच्या डिस्चार्जचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत लिहिले की, कोरोनाशी लढा देताना महाराष्ट्रातील लोकांची कोणतीही वयोमर्यादा राहत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी