१३ वर्षाच्या गरोदर मुलीबाबतचं धक्कादायक सत्य आलं समोर 

13 year old girl Pregnant: गेल्या महिन्यातच एका १३ वर्षाच्या मुलीने असा दावा केला होता की, तिच्या गर्भात असलेल्या मुलाचा बाप हा तिचा १० वर्षांचा प्रियकर आहे.

13 year old girl pregnant with 10 year old boy truth revealed in investigation
१३ वर्षाच्या गरोदर मुलीबाबतचं धक्कादायक सत्य आलं समोर 

मॉस्को (रशिया): साधारण महिन्याभरापूर्वी एक अशी बातमी समोर आली होती की, एक १३ वर्षाची मुलगी ही १० वर्षाच्या मुलाकडून प्रेग्नंट झाली आहे. त्यावेळी या दोघांनी एका न्यूज चॅनलला मुलाखत देखील दिली होती आणि जन्माला येणारं बाळ हे आपलचं असल्याचा दावा केला होता. मात्र, अनेक डॉक्टरांना याबाबत शंका वाटत होती. कारण की, त्यांच्या मते, १० वर्षाच्या मुलाच्या शरीरात शुक्राणूंची निर्मितीच होत नाही. मात्र, मुलीने डॉक्टरांचा देखील दावा फेटाळून लावला होता. 

दरम्यान, आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी एक नवीन खुलासा केला आहे. या प्रकरणात एका १५ वर्षाच्या मुलाला 'हाउस अरेस्ट'  करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा १५ वर्षाचा मुलाकडूनच १३ वर्षाची मुलगी गरोदर राहिली आहे. रशियातील एका मोठ्या वर्तमानपत्राने असा दावा केला आहे की, पोलिसांनी या प्रकरणातील १५ वर्षांच्या संशयित मुलाला हाऊस अरेस्ट केली आहे. त्यांना अशा संशय आहे की, मुलगी याच मुलापासून प्रेग्नंट राहिली आहे. 

दरम्यान, जी १३ वर्षाची मुलगी आधी दावा करत होती की, १० वर्षाचा मुलगा हाच तिचा बॉयफ्रेंड असून आपण त्याच्यापासूनच प्रेग्नंट आहोतय. तिनेच आता स्वतः पोलिसांना असा जबाब दिला आहे की, या १५  वर्षांच्या मुलासोबत आपले शारीरिक संबंध होते. दरम्यान, पोलिसांनी मुलाची ओळख जाहीर केलेली नाही. परंतु रशियातील सायबेरियाच्या घरात तो नजरकैदेत आहे. रशियामध्ये सहमतीने सेक्स करण्यासाठी १६ वर्षाची मर्यादा आहे.

प्रेग्नंट मुलीने आधी काय दावा केला होता? 

रशियन वाहिनीवरील मुलाखतीदरम्यान १० वर्षीय मुलगा आणि १३ वर्षीय मुलगी यांनी त्यांच्या रिलेशनशीपबाबत सर्व प्रश्नांची उत्तरं दिली होती. दुसरीकडे डॉक्टर या गोष्टीवर ठाम होते की, या वयात १० वर्षाच्या मुलाच्या शरीरात शुक्राणू तयार होऊ शकत नाही. परंतु मुलगी डॉक्टरांचं म्हणणं सतत नाकारत होती. 

तिने याबाबत असं सांगितलं होतं की, तिचे आई-वडील घरी नसताना १० वर्षाच्या मुलासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. आईने दार उघडू नये यासाठी तिने चावीने दरवाजा बंद करुन घेतला होता. असंही तिने सांगितलं होतं. दरम्यान, एके दिवशी तिला उलट्या होऊ लागल्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी ती गरोदर असल्याचं सांगितलं. तेव्हा तिने तिच्या पालकांना असं सांगितलं होतं की, ती १० वर्षाच्या मुलापासून प्रेग्नंट आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...