Old Box Found : मुर्तीखाली खोदकाम करताना मजुरांना सापडला सव्वाशे वर्षे जुनी पेटी, पेटी उघडल्यानंतर सगळे झाले आश्चर्यचकित

 Old Box Found या जगात अनेक रहस्य काळाच्या उदरात गडप झाले आहेत. संशोधन आणि उत्खननाच्या माध्यमातून अनेक कोडीत सुटत आहेत. अशाच प्रकारे अमेरिकेत एक खोदकामादरम्यान तांब्याची पेटी सापडली आहे.

old box found
सव्वाशे वर्षे जुनी पेटी  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • अमेरिकेत खोदकामादरम्यान तांब्याची एक पेटी सापडली आहे.
  • ही पेटी तब्बल सव्वाशेहून अधि वर्षे जुने आहे.
  • ही पेटी उघडल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

Old Box Found : रिचमंड : या जगात अनेक रहस्य काळाच्या उदरात गडप झाले आहेत. संशोधन आणि उत्खननाच्या माध्यमातून अनेक कोडीत सुटत आहेत. अशाच प्रकारे अमेरिकेत खोदकामादरम्यान तांब्याची एक पेटी सापडली आहे. ही पेटी तब्बल सव्वाशेहून अधि वर्षे जुने आहे. ही पेटी उघडल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार काही मजूर  अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यात २० व्या शतकातील लष्कर अधिकारी जनरल रॉबर्ट यांच्या प्रतिमेखाली खोदकाम करत होते. तेव्हा खोदकामादरम्यान मजुरांना एक तांब्याची पेटी आढळली.  ही पेटी पाहून सर्व मजूर आणि उपस्थित अधिकारी चकित झाले. ही पेटी तब्बल १३० वर्षापूर्वी इथे पुरण्यात आली होती. व्हर्जिनियाचे गव्हर्नर राल्फ नॉर्थम यांनी याचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. ही तांब्याची पेटी म्हणजे एक ‘टाईम कॅप्सुल असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या टाईम कॅप्सुलचाच अनेक दिवस आपण शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या टाईम कॅप्सुलमध्ये जेव्हा अमेरिकेत गृहयुद्ध झाले होते त्याबद्दल दस्तावेज आहेत. तसेच अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे जुने फोटो, जुनी नाणी, बटन, बंदुकीच्या गोळ्या आणि जुन्या काळातील नकाशे आढळले आहेत. 


जनरल रॉबर्ट  ई ली हे विसाव्या शतकातील मोठे लष्कर अधिकारी होते. १८७० सलई त्यांचे निधन झाले. त्यांच्या आठवणीत १८९० साली हा पुतळा बसवण्यात आला होता. जनरल रॉबर्ट यांचा पुतळा म्हणजे वंशभेदाच्या अन्यायाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. त्यांच्या पुतळ्याखाली आढळलेल्या या पेटीचा तपास सुरू आहे.  पेटीत सापडलेल्या वस्तूंच्या माध्यमातून काही रहस्य उलगडू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी