बाप रे बाप, १४ फुटांचा साप, ६ जणांनी उचलला फोटो व्हायरल 

ओडिशामधील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी 14 फूट लांब किंग कोब्रा साप पकडला आहे. हे पाहून लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

14 feet long male adult king cobra weighting over 6 kgs rescued from village in badamba cuttack odisha
बाप रे बाप, १४ फुटांचा साप, ६ जणांनी उचलला फोटो व्हायरल  

थोडं पण कामाचं

  • ओडिशामधील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी 14 फूट लांब किंग कोब्रा साप पकडला आहे.
  • हे पाहून लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
  • ज्याची लांबी पाहून वनविभागाच्या कर्मचार्‍यांनाही हैराण झाले आहेत.

कटक :  जगभरात विविध प्रकारचे साप (snake) आहेत. ते पाहून लोकांच्या अंगावर काटा येतो. ओडिशामध्ये  (odisha)अशाच एका सापाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. ज्याची लांबी पाहून वनविभागाच्या कर्मचार्‍यांनाही हैराण झाले आहेत. हा साफ तब्बल 14 फूट लांबीचा असल्याचे वर्णन केले जात आहे, ज्याला कटकमधील एका खेड्यातून वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी पकडले.

प्रतिमा

ओडिशा वनविभागाच्या कर्मचार्‍यांच्या म्हणण्यानुसार, कटकच्या बदाम्बा गावातून 14 फूट लांबीचा साप पकडला गेला आहे. हा एक वयस्क किंग कोब्रा साप असल्याची माहिती आहे. त्याचे वजन 6.6 किलो आहे. त्याला गोपापुरातील तलाचंद्रगिरी अभयारण्यात सोडण्यात आले.


ग्रामस्थांमध्ये भीती

एवढा मोठा साप पाहून गावकरी घाबरले. त्यांनी तात्काळ याबाबत वनविभागाला कळविले, त्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत साप पकडला. वनविभागाने एक छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे, ज्यामध्ये सहा लोकांनी हातात साप धरलेला दिसत आहेत.  

साप पकडल्यानंतर ग्रामस्थांनी आता सुटकेचा श्वास घेतला आहे. ओडिशामध्ये काही दिवसांपूर्वी एका टोळीकडून 1 लिटर विष जप्त केल्याचे प्रकरण समोर आले. या भागात सर्प विषाच्या तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात १ लीटर सापाच्या विषाची किंमत 1 कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांच्या मते, 1 लिटर सापांचा विष गोळा करण्यासाठी सुमारे 200 कोबरा आवश्यक आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी