Viral: अल्पवयीन मुलीचा वेडेपणा, प्रेमासाठी HIV पॉझिटिव्ह प्रियकराचे रक्त घेतलं स्वत:च्या शरीरात

Viral Story : फेसबुकच्या माध्यमातून एका १५ वर्षीय तरुणाची एका मुलाशी मैत्री झाली होती. पण आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी अल्पवयीन मुलीने जे काही केलं तो निव्वळ वेडेपणा असल्याचं आता समोर आलं आहे.

15 year old girl took out blood of hiv positive boyfriend injected it into body to prove real love
अल्पवयीन मुलीचा वेडेपणा, HIV पॉझिटिव्ह प्रियकराचे घेतले रक्त  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • एका विचित्र पद्धतीने अल्पवयीन मुलीने तिच्या प्रियकरावर व्यक्त केले प्रेम
  • मुलीने HIV पॉझिटिव्ह प्रियकराचे काढले रक्त
  • प्रेम सिद्ध करण्यासाठी प्रियकराच्या शरीरातील काढलेले रक्त इंजेक्शनद्वारे टोचून घेतले स्वत:च्या शरीरात

Blind Love: सुआलकुची (आसाम): 'प्रेम आंधळ असतं...' असं नेहमी म्हटलं जातं. कारण प्रेमात (Love) आकंठ बुडालेली व्यक्ती कोणत्याही परिणामांचा कधीच विचार करत नाही. ज्यामुळे कधीकधी त्याचे परिणाम अत्यंत वाईट असे होतात. असाच एक प्रकार ईशान्येकडील आसाम (Assam) राज्यातील सुआलकुची जिल्ह्यात घडला असल्याचं आता समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीने (Minor Girl) आपल्या प्रियकरावर (Lover) विचित्र पद्धतीने प्रेम व्यक्त केले आहे. खरंतर, तिचं आपल्या प्रियकरावर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी तिने जे काही केलं त्याला एक प्रकारे आत्महत्या (Suicide) असंच म्हणावं लागले. (15 year old girl took out blood of hiv positive boyfriend injected it into body to prove real love) 

कारण की, अल्पवयीन मुलीने चक्क आपल्या प्रियकराचे एचआयव्ही पॉझिटिव्ह रक्त काढून ते इंजेक्शनच्या मदतीने स्वत:च्या शरीरात टोचून घेतलं. ज्यामुळे आता या मुलीला देखील एचआयव्हीची लागण होण्याची दाट शक्यता आहे.

अधिक वाचा: Viral Video : हत्तींसोबत सेल्फी घेण्याच्या नादात गेला असता जीव! धावून आलेल्या हत्तींचा व्हिडिओ होतोय व्हायरल

फेसबुकच्या माध्यमातून मुलीची झालेली प्रियकरासोबत मैत्री 

मुलीचा प्रियकर हा हाजोच्या सातडोला येथील रहिवासी आहे. फेसबुकच्या माध्यमातून त्याची एका 15 वर्षीय मुलीशी मैत्री झाली होती. यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. खरं तर दोघे प्रेमांत आकंठ बुडालेच. कालांतराने त्यांच्यातील प्रेम हे अधिकाधिक गहिरं होतं गेलं. त्यामुळे दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. 

ऑनलाइन वृत्तानुसार, प्रेमात पडलेली मुलगी ही आपल्या प्रियकरासोबत वारंवार पळून जात होती. अनेकवेळा ती मुलासोबत पळून गेली होती आणि प्रत्येक वेळी तिचे पालक तिला घरी घेऊन येत होते. हा सगळा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता.

अधिक वाचा: मुलाला जन्म देण्यासाठी महिलेने घेतले तीन पुरुषांचे वीर्य, प्रेग्नंट होताच बसला मोठा धक्का

अखेर मुलीने आपलं प्रियकरावर किती प्रेम आहे हे दाखविण्यास एक भयंकर पाऊल उचललं. ज्याने मुलीचे पालकच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला धक्का बसला आहे. 

आपल्या प्रेमाला होणार विरोध मोडून काढण्यासाठी अल्पवयीने मुलीने  अत्यंत कठोर असे पाऊल उचलले. तिने यावेळी इंजेक्शनच्या साहाय्याने तिच्या एचआयव्ही पॉझिटिव्ह प्रियकराच्या शरीरातून रक्त काढले आणि नंतर तेच इंजेक्शन स्वतःला टोचून घेतले. ज्यामुळे आता तिला देखील एड्सची लागण होण्याची दाट शक्यता आहे. 

अधिक वाचा: Anjali Arora MMS Video:  कच्चा बदाम फेम अंजली अरोराचा MMS व्हिडीओ लीक? ट्विटवर नेटकर्‍यांनी दिल्या या प्रतिक्रिया

आपल्या प्रेमाला घरचे विरोध करतात हे अल्पवयीन मुलीला सहन होत नव्हतं आणि त्यामुळेच तिने हे अत्यंत टोकाचं असं पाऊल उचललं असल्याचं समजतं आहे. 

आता हे प्रकरण समोर येताच सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेक जण मुलीच्या या कृतीला वेडेपणा ठरवत आहे. तिने स्वत:ने आपला मृत्यू ओढावून घेतला असल्याचं देखील बोललं जात आहे. 

दरम्यान, या सगळ्या प्रकरणामुळे अल्पवयीन मुलांमधील सोशल मीडियाचा वापर आणि त्याचे होणारे प्रतिकूल परिणाम हा एक चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे आता या सगळ्यावर चिंतन करण्याची गरज असल्याचं प्रकर्षाने जाणवू लागलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी