Viral News: या जगात पैसे कमवण्यासाठी लोक भन्नाट कल्पना वापरतात. ज्याचा आपण कधी विचार देखील करत नाही. त्याचवेळी काही लोक खूप मेहनत करतात. तर काही लोक नशिबाच्या जोरावर पैसे कमावतात. अनेकांना सहज यश मिळते, तर अनेकांना मेहनत करूनही फायदा होत नाही. पण, आज आम्ही तुम्हाला अशा महिलेबद्दल सांगणार आहोत, जी फक्त तिच्या दोन बोटांच्या जोरावर लाखो रुपयांची कमाई करत आहे.
दोन बोटांनी कमाल करणाऱ्या या महिलेचा सोशल मीडियावर प्रचंड बोलबाला आहे आणि लाखो लोकांना तिने अक्षरश: वेड लावलं आहे. चला तर मग जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय.
एली राय असे या ३८ वर्षीय महिलेचे नाव आहे. एलीने ज्या पद्धतीने पैसे कमावले त्यामुळे संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे. एली फक्त तिच्या अंगठे वाकविण्याच्या युक्तीने लाखो रुपयांची कमाई करत आहे. तिच्या दोन्ही अंगठ्याची बोटे लवचिक आहेत की ज्यामुळे ती सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध झाली आहे.
अधिक वाचा: कारमधून उतरलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला
एली म्हणते की, ती इतर कोणाहीपेक्षा तिचा अंगठा अधिक वाकवू शकते. एवढेच नाही तर या कलेचा ती पुरेपूर वापर करत आहे आणि आता तर ती टिकटॉक स्टार झाली आहे.
दोन बोटांची कमाल आणि लाखो रुपयांची कमाई
मीडिया रिपोर्टनुसार, एली या टॅलेंटमधून महिन्याला लाखो रुपये कमावत आहे. काही दिवसांपूर्वी एली ही एक नर्स म्हणून काम करत होती. पण, एका पॉर्न साइटवर काम केल्याचं हॉस्पिटल प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले.
नोकरी गेल्यानंतर एली ही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह झाली आणि त्यातच तिने तिचं पूर्णवेळ करिअर बनविण्याचा निर्णय घेतला. पाहता पाहता.. एली सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध झाली आणि लोकांनी तिच्या प्रत्येक व्हिडिओ प्रचंड लाईक्स दिले. इतकेच नाही तर लोक तिच्या अंगठ्याचे व्हिडिओ आणि फोटो देखील विकत घेत असल्याचं आता समोर आलं आहे. ज्यामधून ती प्रचंड कमाई करत आहे. विशेष म्हणजे एली तीन मुलांची आई आहे. इन्स्टाग्रामवरही लोक तिला प्रचंड फॉलो करतात. तिथे देखील तिच्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळत असल्याचं आता पाहायला मिळतंय.