'आतापर्यंत ३० जणांसोबत सेक्स', २१ वर्षीय स्टारचा टीव्ही शोमध्ये धक्कादायक खुलासा

Rebecca Gormley: लव्ह आयलँड स्टार रेबेका गोर्मले हिने एका टीव्ही शोमध्ये अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे. त्यावरुन आता सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे.  

21 year old rebecca has made physical relations with 30 people so far  people made negative comments after her statement
'आतापर्यंत ३० जणांसोबत सेक्स', २१ वर्षीय स्टारचा खुलासा  |  फोटो सौजन्य: Instagram

लंडन: लव्ह आयलँड स्टार रेबेका गोर्मले ही सध्या सोशल मीडियावर खूपच ट्रोल होत आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की २१ वर्षांची ही तरुणी चर्चेत राहण्यासाठी विचित्र वक्तव्य करत आहे. रेबेकाने नुकतंच असं विधान केलं होतं की, तिने आतापर्यंत तब्बल ३० पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवले आहेत.  नुकत्याच एका टीव्ही शो दरम्यान रेबेकाने खुलासा केला आहे की, २१व्या वर्षापर्यंत तिने वेगवेगळ्या ३० लोकांसोबत सेक्स केला आहे.

रेबेकाने यावेळी असंही म्हटलं की, त्यापैकी बहुतेक जण हे तरूण होते. ज्यांच्यासोबत तिने शारीरिक संबंध ठेवले होते. जेव्हा रेबेकाने टीव्ही शो दरम्यान हा खुलासा केला तेव्हापासून सोशल मीडियातून तिला सतत ट्रोल केलं जाऊ लागलं. अनेकांनी तिच्या खुलासानंतर नकारात्मक टिप्पण्या केल्या आहेत. अनेकांच्या मते, लव्ह आयलँड स्टार हा शो पाहणार्‍या तरुण मुलींसमोर ती एक वाईट उदाहरण ठेवत आहे.

तर बरेच जण हे रेबेकाचा दावाच मूर्खपणाचा आहे असं म्हणत आहेत. ती खोटं बोलत असल्याचं अनेकांना वाटतं. बऱ्याच जणांना असं वाटतं की, 'एवढ्या लहान वयात इतक्या लोकांशी शारीरिक संबंध ठेवणं हे शक्य नाही. त्यामुळे रेबेका खोटं बोलत आहे.' त्याचवेळी एका ट्विटर युजरने असं म्हटलं आहे की, 'रियालिटी स्टार रेबेकाने हिने लोकांसमोर वस्तुस्थिती मांडली आहे.' दुसरीकडे रेबेकाने हा खुलासा केल्यानंतर अनेक तिच्यावर तिरस्कारयुक्त टिप्पणी करत आहेत. 

बहुतेक जण रेबेकावर टीका जरी करत असले तरीही काही जणांनी रेबेकाच्या धैर्याचं कौतुक केलं आहे. त्यांच्या मते, रेबेकाने प्रामाणिकपणे आपला मुद्दा लोकांसमोर मांडला आहे. त्यामुळे यामध्ये काहीही चुकीचे नाही. त्यांच्या मते रेबेकाचे स्वतःचे वैयक्तिक जीवन आहे. त्यामुळे तिला जे हवं ते ती करू शकते. त्यात कोणालाही अडचण असू नये.

दरम्यान, तिच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियामध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहे. पण यामुळे रेबेका सध्या खूपच चर्चेत आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी