22 वर्षीय महिला जेलरचे कैद्यावर बसले प्रेम, पायावर काढलेल्या गुप्त टॅटूमुळे उघडकीला आले मोठे रहस्य [PHOTOS]

व्हायरल झालं जी
Updated Apr 16, 2021 | 14:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

एका 22 वर्षीय महिला जेलरचे तिच्या कैद्यावरच प्रेम बसल्याची चमत्कारिक घटना समोर आली आहे. प्रेमात वेड्या झालेल्या या महिला जेलरने सदर कैद्याच्या क्रमांकाचा टॅटू आपल्या पायाच्या वरील भागावर गोंदवूनही घेतला आहे.

Female prison officer
22 वर्षीय महिला जेलरचे कैद्यावर बसले प्रेम, पायावर काढलेल्या गुप्त टॅटूमुळे उघडकीला आले मोठे रहस्य 

थोडं पण कामाचं

  • आपल्याच कैद्याच्या प्रेमात पडली महिला जेलर
  • नियम मोडून कैद्याला दिल्या बंदी असलेल्या सेवा
  • कोर्टाने कैद्याला सुनावली आहे 10 महिन्यांची शिक्षा

नवी दिल्ली: न्यायालयाने (Court) 10 महिने कारागृहाची (jail) शिक्षा (sentence) सुनावलेल्या एका कैद्यावर (prisoner) त्याच्या कारागृहाच्या (jail) जेलरचे (jailor) प्रेम (love) जडल्याची घटना समोर येत आहे. या जेलरने आपल्या पायावर त्या कैद्याच्या क्रमांकाचा (prisoner number) टॅटूही (tattoo) करून घेतला आहे. 22 वर्षीय स्कार्लेट एल्ड्रिच एक अशा कारागृहाची जेलर आहे जिथे मोठ्या गुन्हेगारांना (serious criminals) ठेवले जाते. पण इथे तीच त्यांच्यापैकी एकाच्या प्रेमात पडली आहे.

जेलरने गोंदवून घेतला टॅटू

हा प्रकार इंग्लंडमधला आहे. प्रेमात पडलेल्या या जेलरने या कैद्याला मोबाईल मिळवून दिला आहे, इतकेच नाही, तर त्याच्यासाठी सिम कार्डचीही व्यवस्था केली आहे. जेलच्या अधिकाऱ्यांना बऱ्याच काळापासून तिच्यावर संशय होता, पण या जेलरला वैद्यकीय चाचणीतून जावे लागले आणि तिने पायावर काढलेल्या टॅटूबद्दल सर्वांना कळले तेव्हा त्यांची खात्री झाली. या टॅटूमध्ये या कैद्याचा क्रमांक लिहिलेला होता. ही जेलर एल्ड्रिचचे सावत्र वडील आणि आई हे दोघेही पोलीस अधिकारी आहेत.

कोर्टाने सुनावली ही शिक्षा

जेलर एल्ड्रिचने जेलमधील आपल्या प्रियकराला प्रेमपत्रेही लिहिली होती. तिच्या शरीरावर अनेक टॅटू आहेत. हे प्रकरण कोर्टात पोहोचले तेव्हा पोलिसांनी सर्व पुरावे न्यायालयासमोर ठेवले आणि न्यायाधिशांनी तिला 10 महिन्यांची शिक्षा सुनावली आणि म्हटले की तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा विचार केला होता, पण यामुळे तिच्या कुटुंबियांवर विपरीत परिणाम होईल. न्यायाधिशांनी म्हटले की हा गुन्हा इतका गंभीर आहे की शिक्षा म्हणून कमीत कमी 10 महिने तिला कारागृहात ठेवता आले असते.

कोर्टाने काय म्हटले याप्रकरणी, जाणून घ्या

न्यायाधिशांनी सांगितले की आपल्या कैद्याशी जवळचे संबंध बनवण्याच्या स्पष्ट धोक्याची कल्पना प्रशिक्षणादरम्यान जेलच्या अधिकाऱ्यांना दिले गेलेले असते, पण तरीही दरोडा टाकल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या कैद्याशी तिने संबंध ठेवले. स्वतःला त्याच्या ताब्यात देऊन जेलची सुरक्षा धोक्यात आणली. कोर्टाने म्हटले की हे एक उच्च सुरक्षा असलेले जेल होते जिथे मोबाईल फोन आणि सिमकार्डच्या वापरावर बंदी आहे. या नियमांचे उल्लंघन करून सदर जेलरने तिच्यावर दाखवलेल्या विश्वासाचा अपमान केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी