Shocking News In Marathi | मुंबई : जगातील प्रत्येकाला तंदुरुस्त आणि सुंदर दिसावे असे वाटते. यासाठी काही लोक खूप मेहनत करतात, तर काही लोक पैसे खर्च करून आपले सौंदर्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करतात. काहींना यामध्ये यश मिळते तर काहींचे सुंदर दिसण्याचे स्वप्न स्वप्नच राहते. पण वयाच्या ५३ व्या वर्षी एक महिला आपल्या हॉटनेसमुळे सर्वांचे लक्ष वेधत आहे. दरम्यान ५३ व्या वर्षी म्हणजेच साधारण महिलेचा आजी होण्याचा कालखंड असतो. मात्र वयाच्या ५३ व्या वर्षी या महिलेने आपल्या लूकने भल्याभल्यांना घाम फोडला आहे. तिची बॉडी पाहून लोक तिचे चाहते बनले आहेत. तर आजही तरूणाई तिच्यासोबत डेटवर जाण्यासाठी इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे. (53-year-old lady goes viral due to fitness).
अधिक वाचा : पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही - सुप्रिया सुळे
५३ वर्षीय 'आजी' सध्या सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहेत. तिचे नाव अँड्रिया सनशाइन आहे. वर्कआउट्सच्या बाबतीत ती पुरुषांनाही टक्कर देत आहे. या वयातही तिच्याकडे ६ पॅक ॲब्स आहेत. असे म्हटले जाते की अँड्रिया एक व्यावसायिक बॉडीबिल्डर तसेच डच मॉडेल आहे. लक्षणीय बाब म्हणजे तिचा फिटनेस पाहून तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलांनाही तिच्यासोबत डेटवर जावेसे वाटत आहे. सुपरहिट 'आजी' या नावाने प्रसिद्ध असलेली अँड्रिया म्हणते की, २५ ते ३० वर्षांच्या पुरुषांना माझ्यासोबत डेटवर जायचे आहे.
अँड्रियाने सांगितले की, ती दररोज तीन तास वर्कआउट करते. मात्र अनेकदा तिने ८ तास देखील व्यायाम केला आहे. याशिवाय ती खूप आरोग्यदायी आहार घेते. ती अधिक प्रथिनांचे सेवन करते आणि ब्रोकोली आणि हिरव्या भाज्या खाते. एवढेच नाही तर ती मीठ आणि तेलाचे सेवन करत नाही. यामुळेच तिचे सौंदर्य अजून तरूण मुलीसारखे असल्याचे तिचे म्हणणे आहे.