Viral News : मटण खाऊन 22 वर्षीय तरुणी पडली 55 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, अनोखी लव्हस्टोरी बनली चर्चेचा विषय

Viral News : एका पाकिस्तानी जोडप्याची लवस्टोरी चांगलीच चर्चेत आहे. एक 22 वर्षीय तरुणी 55 वर्षांच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. या व्यक्तीने तरुणीला मटण खाऊ घातले. हे मटण खाऊन तरुणी या व्यक्तीच्या प्रेमातच पडली. या जोडप्याने एका युट्युबरील एका चॅनेलवर ही रंजक कथा सांगितली आहे.

pakistani viral love story
पाकिस्तानी व्हायरल लव स्टोरी 
थोडं पण कामाचं
  • एका पाकिस्तानी जोडप्याची लवस्टोरी चांगलीच चर्चेत आहे.
  • एक 22 वर्षीय तरुणी 55 वर्षांच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे.
  • या व्यक्तीने तरुणीला मटण खाऊ घातले. हे मटण खाऊन तरुणी या व्यक्तीच्या प्रेमातच पडली.

Viral News : इस्लामाबाद : एका पाकिस्तानी जोडप्याची लवस्टोरी चांगलीच चर्चेत आहे. एक 22 वर्षीय तरुणी 55 वर्षांच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. या व्यक्तीने तरुणीला मटण खाऊ घातले. हे मटण खाऊन तरुणी या व्यक्तीच्या प्रेमातच पडली. या जोडप्याने एका युट्युबरील एका चॅनेलवर ही रंजक कथा सांगितली आहे. (55 year old man make mutton for 22 year old girl she fall in love pakistan strange love story)

अधिक वाचा :  Viral Video: अद्भूत, एका हाताने बनवली 15 छायाचित्रे, गरीब मुलीचे टॅलेंट पाहून व्हाल थक्क, नाव गिनिज बुकात दाखल  

पाकिस्तानमध्ये रफीक हे 55 वर्षांचे असून आलिया ही 22 वर्षीय तरुणी आहे. दोघे एका रिक्षातून जात होते. तेव्हा रफीक आलियाकडे एकटक बघत होते. काही वेळ आलियाने रफीककडे दुर्लक्ष केले. परंतु तरी रफीक आलियाकडे बघतच होते. तेव्हा आलियाने रफीकच्या जोरात कानाखाली मारली आणि निघून गेली. त्यानंतरही रफीकने आलियाचा पाठलाग केला आणि तिच्या घरापर्यंत पोहोचला. तेव्हा आलिया आणि रफीकमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर रफीक तिथून निघून गेला. 

अधिक वाचा : Girl jumped from balcony: नशेच्या गर्तेत बाल्कनीतून मारली उडी, व्हिडिओ पाहून येईल अंगावर काटा

दुसर्‍या दिवशी रफीक परत आलियाचा घरी पोहोचला तेव्हा आलिया पुन्हा चिडली आणि दोघांमध्ये भांडणे झाली. त्यानंतर रफीक पुन्हा घरी परतला. तिसर्‍या दिवशी रफीक परत आलियाच्या दारात उभा राहिला. तेव्हा आलियाने त्यला काय हवंय म्हणून विचारणा केली. तेव्हा रफीकने आपल्या घरात नोकरी द्या अशी मागणी केली. तसेच आपल्याला चांगला स्वयंपाक येतो आणि घरातील सगळी कामे येतात असे रफीकने आलियाला सांगितले. 

अधिक वाचा :  Viral Video: लग्न मंडपात नववधू अन् नवरदेवाने केलं असं काही की... पाहून सर्वच झाले अवाक्

आलियाने रफीकला घरात कामावर ठेवले. तेव्हा रफीक घरातील सर्व कामे करायचा. रफीक चांगला स्वयंपाक करायचा आणि आलियाला खाऊन घालायचा. एके दिवशी आलियाने रफीकला मटण हंडी बनवायला सांगितली. रफीकने मटण हंडी बनवली आणि आलियाला खाऊ घातली. आलियाला मटण हंडी इतकी आवडली की ती त्याच्या प्रेमातच पडली. ज्या पद्धतीने रफीक स्वयंपाक करतो आणि खाऊ घालतो तसेच आपली जितकी काळजी घेतो इतके आपल्यासाठी कुणीच करणार नाही अशी प्रतिक्रिया आलियाने दिली. रफीकच्या याच गुणामुळे आपण त्याच्या प्रेमात पडलो अशी कबुली आलियाने दिली.  रफीक घरातील सर्व काम करतो. तर आपण  ऑनलाईन काम करून पैसे कमावते असे आलियाने  शेवटी नमूद केले. 

अधिक वाचा : VIRAL VIDEO: धावत्या कारच्या छतावर फटाके फोडले अन् पोलिसांनी पकडताच कान पकडून उठाबशा काढू लागले

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी