Optical Illusion: ऐकलं का! ६ मुली पण पायांच्या फक्त ५ जोड्या, जाणून घ्या काय आहे सत्य

व्हायरल झालं जी
Updated Apr 13, 2022 | 15:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Optical Illusion । सध्या सोशल मीडियावर असे काही फोटो व्हायरल होत आहेत, जे पाहून आपल्याच डोक्याचे दही होते. असाच एक फोटो सोशल मीडियावर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे.

6 girls but only 5 pairs of legs, know what is true
६ मुली पण पायांच्या फक्त ५ जोड्या, जाणून घ्या काय आहे सत्य  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा अंदाज लावणे देखील खूप कठीण आहे
  • सध्या असाच एक गोंधळ निर्माण करणारा फोटो व्हायरल होत आहे.
  • व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये ६ मुली सोफ्यावर बसलेल्या दिसत आहेत.

Optical Illusion । मुंबई : सध्या सोशल मीडियावर असा काही एक फोटो व्हायरल होत आहेत, जो पाहून आपल्या देखील डोक्याचे दही होईल. कारण हा एक फोटो सोशल मीडियावर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे. हा फोटो समजून घेण्यासाठी लोक त्यांच्या मेंदूचा जोरदार वापर करत आहेत. यानंतरही फोटोत दडलेले रहस्य शोधण्यात लोकांना अपयश येत आहे. (6 girls but only 5 pairs of legs, know what is true). 

फोटोने लोकांच्या डोक्याचे केले दही 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये ६ मुली सोफ्यावर बसलेल्या दिसत आहेत. या क्षणापर्यंत सर्व काही ठीक आहे, परंतु जेव्हा तुमचे लक्ष मुलींच्या पायाकडे जाईल तेव्हा तुम्ही देखील गोंधळून जाल. फोटो पाहताना समजते की ६ मुली सोफ्यावर बसल्या आहेत, परंतु पायांच्या फक्त ५ जोड्या दिसत आहेत. फोटोत एका जोडीचे पाय गायब झाल्याचे दिसत आहे. पण कोणत्या मुलीचा पाय गायब आहे याबाबत संभ्रम आहे. 

अधिक वाचा : धनंजय मुंडेंना हार्ट अटॅक नाही आला - अजित पवार

6 girls but only 5 pairs of legs

या फोटोतील कोडे सोडवताना बुध्दीवान लोक देखील गोंधळून गेली आहेत. सोशल मीडियावर हा फोटो समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पाहून काही लोक आश्चर्यचकित झाले आहेत, तर काही लोक फोटोशॉपने फोटो एडिट करून पाय गायब झाल्याचे सांगत आहेत. ६ मुलींपैकी एका मुलीचा पाय कुठे गायब झाला हे सध्या तरी समजू शकलेले नाही.

जाणून घ्या काय आहे या फोटोमागील सत्य

फोटो पाहून अनेक युजर्स प्रश्न विचारत आहेत की एक मुलगी पाय नसलेली होती का? तुम्ही फोटोत पाहू शकता की ५ महिला सोफ्यावर बसल्या आहेत तर एक महिला सोफ्याच्या उजव्या बाजूला बसलेली आहे. तर चार महिला पाय रोवून बसल्या आहेत. फोटोत डाव्या बाजूने तिसऱ्या क्रमांकावर बसलेल्या महिलेचे पाय गायब आहेत. सध्या आपण या फोटोच्या माध्यमातून पाहू शकतो की मुलीचे पाय कुठे आहेत. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी