वय ६४ पण फुटबॉल खेळण्याचे कौशल्य पाहून भले भले चक्रावले

64 year old truck driver plays great football you will salute after watching the viral video : मनापासून इच्छा असेल तर कोणत्याही कामासाठी वय आडवं येत नाही. माणूस मनातून तरुण असेल तर तरुणांसारखी उत्साहाने कामं करू शकतो, असं म्हणतात. ही सगळी वाक्य एका ६४ वर्षांच्या ट्रक चालकाच्या बाबतीत खरी ठरताना दिसतात. 

64 year old truck driver plays great football you will salute after watching the viral video
वय ६४ पण फुटबॉल खेळण्याचे कौशल्य पाहून भले भले चक्रावले 
थोडं पण कामाचं
  • वय ६४ पण फुटबॉल खेळण्याचे कौशल्य पाहून भले भले चक्रावले
  • ज्येष्ठ नागरिक आहे ट्रक चालक
  • ज्येष्ठ नागरिकाचे फुटबॉलवरील नियंत्रण कौतुकास्पद

64 year old truck driver plays great football you will salute after watching the viral video : मनापासून इच्छा असेल तर कोणत्याही कामासाठी वय आडवं येत नाही. वय तर एक संख्या आहे. इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. माणूस मनातून तरुण असेल तर तरुणांसारखी उत्साहाने कामं करू शकतो, असं म्हणतात. ही सगळी वाक्य एका ६४ वर्षांच्या ट्रक चालकाच्या बाबतीत खरी ठरताना दिसतात. 

घर चालविण्यासाठी ट्रक चालविणारी ही व्यक्ती आवड म्हणून वेळ मिळेल तेव्हा मैदानाकडे धाव घेते. मैदानावर फुटबॉल खेळणे या व्यक्तीला आवडते. छंद म्हणून सुरुवात करणाऱ्या या व्यक्तीचे फुटबॉल खेळण्याचे कौशल्य बघून भले भले चक्रावले आहेत. 

मैदानात ज्येष्ठ नागरिकाला फुटबॉल खेळताना बघून एका व्यक्तीने व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ अनेकांनी बघितला, लाइक केला आणि शेअर केला. यामुळे फुटबॉल खेळणाऱ्या ६४ वर्षांच्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकांनी फुटबॉल खेळणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचे कौतुक केले आहे. 

व्हिडीओत एका तरुण फुटबॉल खेळण्यासाठी ६४ वर्षांच्या व्यक्तीला चॅलेंज करताना दिसतो. यानंतर तरुणापेक्षा प्रभावीरित्या फुटबॉल खेळून ज्येष्ठ नागरिक तरुणालाही आपला चाहता करून घेताना दिसत आहे. ज्येष्ठ नागरिकाचे फुटबॉल हाताळण्याचे कौशल्य कौतुकास्पद आहे. काहीही झाले तरी फुटबॉलवरचे नियंत्रण गमवायचे नाही हे लक्षात ठेऊन ज्येष्ठ नागरिक प्रभावीरित्या फुटबॉल हाताळताना दिसत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी