प्रेमात वय असतो फक्त आकडा! 67 वर्षीय रामकली पडल्या 28 वर्षीय भोलूच्या प्रेमात, सोबत राहण्यासाठी ओलांडल्या सीमा

प्रेम ही एक अशी भावना आहे, जी माणसाला बदलत असते. कोणतीही व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा त्यांच्यापुढे वर्ण, धर्म, जात, पंथ, पैसा, शिक्षण आणि वय अशा कोणत्याच मर्यादा नसतात. म्हणूनच की काय, हे प्रेम अमर्याद असल्याचंच अनेकजण म्हणतात. प्रेम कोणावरही होऊ शकतं असं आपण म्हणतो, म्हणजे यात वय कोणतंही असलं तरी प्रेमाला सीमा नसते. हीच गोष्ट ग्वाल्हेरमध्ये पाहायला मिळाली आहे.

 67 year old Ramkali , crossed the border for Bholu's love
भोलूच्या प्रेमासाठी 67 वर्षीय रामकली बाईंनी ओलांडल्या सीमा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रामकली ह्या 67 वर्षाच्या असून त्या 28 वर्षाच्या भोलूच्या प्रेमात पडल्या आहेत.
  • न्यायालयात या दोघांनी आपल्या दोघांच्या नावाची लिव्ह इनमध्ये राहण्याची नोटरी बनवली.
  • वादांपासून दूर राहण्यासाठी लिव्हइनमध्ये नोटरी तयार करण्यात येते.

मुंबई : प्रेम ही एक अशी भावना आहे, जी माणसाला बदलत असते. कोणतीही व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा त्यांच्यापुढे वर्ण, धर्म, जात, पंथ, पैसा, शिक्षण आणि वय अशा कोणत्याच मर्यादा नसतात. म्हणूनच की काय, हे प्रेम अमर्याद असल्याचंच अनेकजण म्हणतात. प्रेम कोणावरही होऊ शकतं असं आपण म्हणतो, म्हणजे यात वय कोणतंही असलं तरी प्रेमाला सीमा नसते. हीच गोष्ट ग्वाल्हेरमध्ये पाहायला मिळाली आहे.

ग्वाल्हेरमधील ही प्रेम काहणी ऐकून तुम्ही थक्क व्हाल यात शंका नाही. या प्रेम कहाणीत वयावर काहीतरी झोल असल्याचं तुम्हाला कळलं असेल. परंतु या कहाणीत प्रियकर नाही तर यातील प्रेयसी मोठ्या वयाची आहे, परिपक्व वयाच्या असलेल्या रामकली ह्या 67 वर्षाच्या असून त्या 28 वर्षाच्या भोलूच्या प्रेमात पडल्या आहेत. भोलूच्या प्रेमात त्या इतक्या वेड्यापिश्या झाल्या त्यांनी सर्व सीमा ओलांडल्या आहेत. आता ज्यांनी समाजाच्या सीमा ओलांडल्याचं नाहीत त्यांना तुम्हीतरी कसा प्रेमी म्हणाल बरं. बरोबर ना. तर पाहू रामकली बाईंनी कोणती सीमा ओलांडली ते.

अच्छा 28 वर्षाच्या भोलूसोबत 67 वयाच्या रामकली बाईंना राहायचं आहे. गेल्या 6 वर्षांपासून रामकली आणि भोलू एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि एकत्र राहत आहेत. भविष्यातही एकमेकांना अशीच साथ देण्याची या दोघांचीही इच्छा आहे. पण, पुढे आपल्या नात्यात कोणताही वाद न होवो आणि नातं आणखी घट्ट होवो यासाठीच त्यांनी नोटरी करण्याचा निर्णय घेतला.मग काय करायचं असं राहिलं तर समाज राहू देणार नाही. यामुळे त्यांनी थेट न्यायालयाचं दार ठोठावलं. न्यायालयात या दोघांनी आपल्या दोघांच्या नावाची लिव्ह इनमध्ये राहण्याची नोटरी बनवली. दोघांना सोबत राहायचं आहे, आणि यापुढेही असंच राहण्यासाठी म्हणून त्यांनी न्यायालयातून नोटरी बनवून घेतली आहे.

bholu

कायद्याचा अभ्यास असणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वादांपासून दूर राहण्यासाठी लिव्हइनमध्ये नोटरी तयार करण्यात येते. कायदेशीररित्या अशा कागदपत्रांची आवश्यकता नसते. आवश्यकता असो किंवा नसो, फक्त प्रेम करण्यापर्यंतच न थांबता रामकली आणि भोलू यांनी उचललेलं हे टोकाचं पाऊल म्हणजे त्यांच्या नात्याची एख वेगळी ओळख ठरत आहे असंच म्हणावं लागेल. कारण, या नात्याची नोटरी झाल्यामुळं आता सर्वदूर या आगळ्यावेगळ्या प्रेमकहाणीचीच चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी