Fatehpur DM ailing cow treatment । फतेहपूर : उत्तर प्रदेशच्या फतेहपूर (Fatehpur) जिल्ह्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचा (CMO) एक अनोखा आदेश व्हायरल होत आहे. कारण त्यांनी प्रत्यक्षात फतेहपूरचे जिल्हा दंडाधिकारी (DM) अपूर्व दुबे यांच्या आजारी गायीवर विशेष उपचार करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच ७ डॉक्टरांची ड्युटीही लावण्यात आली आहे. या सरकारी आदेशाशी संबंधित पत्र व्हायरल होत आहे, डीएम अपूर्व दुबे मोठ्या कालावधीपासून फतेहपूर जिल्ह्यात तैनात असल्याचे सांगितले जात आहे. (7 doctors on duty for treatment of sick cow of District Magistrate).
ज्या ७ डॉक्टरांसाठी ड्युटी लावण्यात आली आहे, त्यांच्यासाठी शासनाच्या आदेशानुसार दररोज एका डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली होती. एवढेच नाही तर सातपैकी एकाही डॉक्टरच्या अनुपस्थितीत पर्यायी जागाही तयार ठेवण्यात आली आहे.
लक्षणीय बाब म्हणजे या आदेशात म्हटले आहे की, पशुवैद्यकीय अधिकारी देखील सकाळ संध्याकाळ डीएम महोदय यांच्या गायी पाहायला जातील आणि रोज संध्याकाळी सीएमओ कार्यालयात फोन करून माहिती देतील, असे आदेशात म्हटले आहे. तसेच या कामातील हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचेही म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डीएम साहेबांच्या गायला काही समस्या असेल तर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या डॉक्टरांची ड्युटी लावण्यात येते. यासाठी सरकारी आदेश जारी करण्यात आला आहे.
आदेशात म्हटले आहे की, कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीत त्या दिवशीचे कामकाज डॉ.सुरेशकुमार कन्नोजिया करतील. सीएमओने सोमवारी डॉ.मनीष अवस्थी, मंगळवारी डॉ.भुवनेश कुमार, डॉ. बुधवारी अनिल कुमार, गुरुवारी अजय कुमार दुबे, शुक्रवारी डॉ.शिवस्वरूप, शनिवारी डॉ.प्रदीप कुमार आणि रविवारी डॉ.अतुल कुमार असा आठवड्याचा दिनक्रम असणार आहे.