७४ वर्षांच्या आजीबाई झाल्या जुळ्या मुलीची आई, आजोबा ८० वर्षांचे 

मेडिकल सायन्समुळे काहीही शक्य आहे हे आंध्रप्रदेशात राहणाऱ्या एर्रामत्ती मंगम्मा यांच्या उदाहरणावरून आपण म्हणून शकतो. वयाच्या ७४ वर्षी या महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. 

 Erramatti Mangayamma
एर्रामत्ती मंगम्मा आणि त्यांचे पती राजा राव  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • आयव्हीएफ तंत्राच्या सहाय्याने या महिलेने दोन जुळया मुलींना जन्म दिला 
  • एर्रामत्ती यांचे पती राजा राव ८० वर्षांचे आहेत
  • २०१६ साली पंजाबमध्ये रहाणाऱ्या दलजिंदर कौर यांची वयाच्या ७० व्या वर्षी प्रसुती झाली होती

हैदराबाद :  मेडिकल सायन्समुळे आता काहीही शक्य आहे, हे आंध्रप्रदेशातील ७४ वर्षांच्या एर्रामत्ती मंगम्मा यांच्या उदाहरणामुळे आपण म्हणू शकतो. वयाची ७४ वर्ष पूर्ण झालेल्या मंगम्मा यांचे आई होण्याचे स्वप्न आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे पूर्ण झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे मंगम्मा यांना जुळ्या मुली झाल्या आहेत. यापूर्वी या तंत्रज्ञानामुळे पंजाबमध्ये राहणआऱ्या दलजिंदर कौर या ७० वर्षी महिलेला २०२६ मध्ये प्रसुती करण्यात यश आले होते. विशेष म्हणजे आंध्र प्रदेशातीली मंगम्मा यांचे पती राजा राव यांचे वय ८० वर्ष आहे. हे दोघे आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील निल्लापार्थीपाडू या गावचे रहिवासी आहेत. 

७४ वर्षी जुळ्या मुलींना जन्म देण्याचा विक्रम आता एर्रामत्ती मंगम्मा यांच्या नावावर झाला आहे. 

कोथापेट येथील अहिल्या रुग्णालयात दोन जुळ्या मुली जन्माला आल्या पण त्या विशेष होत्या. त्यांचे वैशिष्ट्य असे की त्या ७४ वर्षीय आईच्या उदरातून जन्माला आल्या होत्या. एर्रामत्ती मंगम्मा यांच्यावर शस्त्रक्रिया करून मुलांना जन्म देण्यात आला. सध्या आई आणि बाळांची तब्येत ठणठणीत आहे. एर्रामती मंगम्मा यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉ. उमाशंकर यांनी सांगितले की, ऑपरेशन करताना कोणतीही अडचण आली नाही. एर्रामत्ती मंगम्मा यांचे वय जास्त होते पण त्यांना हाय बीपी किंवा डायबिटीज नव्हते, त्यामुळे डिलेव्हरी करताना कोणत्याही कॉप्लिकेशन्स नव्हत्या. 

 

 

डिलिवरीनंतरही मंगम्मा यांना हेल्थ इश्यू होईल असे मला वाटत नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मंगम्मा यांचे वय जास्त असल्याने त्यांना मुलींना स्तनपान करता येणार नाही, त्यामुळे दुधाची व्यवस्था मिल्क बँकमधून करण्यात येणार आहे. मंगम्माचे पती राजाराव हे शेतकरी आहेत. एर्रामत्ती मंगम्मा आणि राजा राव यांचे लग्न २२ मार्च १९६२ मध्ये झाले होते. पण गेल्या ५७ वर्षांपासून त्यांना कोणतेही आपत्य नव्हते. त्यांनी यासाठी वेगवेगळे उपचार केले. पण तरीह मंगम्मा यांना गर्भधारणा होत नव्हती. 

गेल्या वर्षी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेला आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे ५५ व्या वर्षी गर्भधारणा झाल्याचे समजले. त्यावेळी त्यांनी या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेतले.  त्यानंतर त्यांनी या माध्यमातून आपणही आई होण्याचा निर्णय घेतला. या वयात आई होण्याचे ठरविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण जगाची चिंता न करत त्यांनी यासाठी लागणाऱ्या चाचण्या केल्या. मग त्या संपूर्ण फीट असल्याचे निष्पन्न झाले आणि मग त्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून गर्भधारणा करण्यात आली, असे डॉक्टरांनी सांगितले. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...