93 वर्षांच्या आजीकडून 'बिअर'ची डिमांड, पुढे झालं असं की...

अमेरिकेत कोविड- 19 चा कहर पाहायला मिळतोय. त्याचदरम्यान पेंसिलवेनियामधून एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत एक आजी चक्क बिअरची मागणी करत आहेत. 

beer demand
93 वर्षांच्या आजीकडून 'बिअर'ची डिमांड, पुढे झालं असं की... 

अमेरिकाः  जगभरात कोरोनाचा प्रभाव झालेल्या पाहायला मिळतोय. भारतात कोरोनाचा फैलाव वाढताना दिसतोय. त्याचसोबत अमेरिकेतही या भयानक व्हायरसमुळे मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर केलं. त्यातच अमेरिकी जिथे या व्हायरसमुळे हैराण झाली आहे. त्याच दरम्यान अमेरिकेतला एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत 90 वर्षांच्या आजीनं चक्क बिअरची डिमांड केली आहे. 

हा व्हायरल झालेला फोटो अमेरिकेतल्या पेंसिलवेनियामधला आहे. जिथे या आजीनं हातात बिअरचा कॅन घेतला आहे आणि त्या बिअरची डिमांड करत आहेत.

93 वर्षांच्या या आजीचं नाव ओलिव वेरोनेसी आहे. ज्यांनी हा फोटो फेसबूकवर अपलोड केला आहे. ज्यात त्यांनी बिअरचा कॅन हातात घेतला आहे आणि त्यांनी बिअर देण्याची डिमांड केली आहे. 

असं म्हटलं जात आहे की, ही फेसबुक पोस्ट ओलिव वेरोनेसी यांच्या नातेवाईंकांपैकी कोणीतरी सोशल मीडियावर शेअर केली होती. ही पोस्ट आता बरीच व्हायरल झाली. त्यानंतर ज्या प्रकारे आजीनं कशा प्रकारे बिअरची डिमांड करत आहे याचा उल्लेख केला आहे. 

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर बिअर कंपनीनं 150 बिअरचे कॅन ओलिव यांच्याकडे पाठवले. त्यानंतर आजीनं बिअर कंपनीनचे आभार मानत म्हटलं की, हे कॅन मी पुढचे 5 महिने चालवू शकते. ओलिव वेरोनेसी यांनी सांगितलं की, मी दररोज बिअर पिते. तुम्हांला माहित आहे का की, बिअरमध्ये विटामिन असतात आणि ती तुमचं आरोग्य ठिक करते, जोपर्यंत तुम्ही याच योग्य प्रमाणात सेवन करत नाही. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी