Shocking: अरे बापरे! गेमच्या व्यसनाने आईच्या खात्यातून उडवले ३६ लाख रूपये 

व्हायरल झालं जी
Updated Jun 09, 2022 | 15:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Online Game Side Effects | अनेक मुलांना ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन लागलेले असते. त्यांना या व्यसनाने एवढे वेढलेले असते की आपल्या आजूबाजूला काय घडते आहे हे देखील त्यांना कळत नाही. तसेच ऑनलाइन गेम्सचे अनेक दुष्परिणामही समोर आले आहेत.

A 16-year-old boy lost Rs 36 lakh from his mother's account for online games
गेमच्या व्यसनाने आईच्या खात्यातून उडवले ३६ लाख रूपये   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अनेक मुलांना ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन लागलेले असते.
  • गेमच्या व्यसनाने आईच्या खात्यातून उडवले ३६ लाख रूपये.
  • हैदराबादमधील धक्कादायक घटना.

Viral News In Marathi | मुंबई : अनेक मुलांना ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन लागलेले असते. त्यांना या व्यसनाने एवढे वेढलेले असते की आपल्या आजूबाजूला काय घडते आहे हे देखील कळत नाही. तसेच ऑनलाइन गेम्सचे अनेक दुष्परिणामही समोर आले आहेत. दरम्यान एका १६ वर्षाच्या मुलाने गेम खेळण्याच्या नादात आईच्या खात्यातून तब्बल ३६ लाख रुपये उडवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे या प्रकरणातील सत्य बाहेर आल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चला तर मग जाणून घ्या काय आहे हे संपूर्ण प्रकरण? (A 16-year-old boy lost Rs 36 lakh from his mother's account for online games). 

अधिक वाचा : आज दुपारी ३ वाजता जाहीर होणार राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा

दरम्यान, हैदराबादमधील एका मुलाला गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. सायबर क्राईम विंगने दिलेल्या माहितीनुसार, मुलाने फ्री फायर गेम त्याच्या आजोबांच्या फोनवर डाउनलोड केला. त्यानंतर त्याला खेळाचे व्यसन लागले. माहितीननुसार मुलाने सुरूवातीला गेममध्ये १,५०० रुपये खर्च केले. त्यानंतर आईच्या बँक खात्यातून १० हजार रुपये गेममध्ये खर्च करण्यात आले. हळूहळू खेळाचे व्यसन वाढत गेले आणि तो लाखो रुपये गेममध्ये गुंतवू लागला. धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीला या प्रकरणाची कोणालाच माहिती नव्हती.

आईच्या खात्यातून उडवले ३६ लाख रूपये 

हळूहळू या मुलाने गेममध्ये एकावेळी दीड ते दोन लाख रुपये गुंतवायला सुरूवात केली. एके दिवशी आईने तिचे बॅंक खाते तपासले तेव्हा तिला धक्काच बसला. कारण तिचे संपूर्ण खाते रिकामे झाले होते. एवढेच नाही तर दुसरे खाते तपासले असता त्यातील ९ लाख रुपये गायब होते. याबाबत महिलेने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तपास केला असता सर्व पैसे गेममध्ये खर्च झाल्याचे समोर आले. जेव्हा आईलाही मुलाचे सत्य समजले तेव्हा तिला धक्काच बसला. महिलेने सांगितले की, ही सर्व रक्कम तिच्या पतीच्या मृत्यूनंतर भरपाई म्हणून मिळाली होती, जे एक पोलिस अधिकारी होती. या गेममध्ये मुलाने एकूण ३६ लाख रुपये खर्च केल्याचे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी