viral story : २४ वर्षीय तरुणाने केले आजीच्या वयाच्या महिलेशी लग्न

24 वर्षांच्या कुराण मॅककेन आणि 61 वर्षीय चेरिल मॅकग्रेगर यांनी 3 सप्टेंबर रोजी लग्न केले, त्यांच्या वयातील मोठ्या अंतरांमुळे नेगेटिव्ह कमेंन्ट मिळत आहेत.

A 24-year-old man marries a woman his grandmother's age
viral story : २४ वर्षीय तरुणाने केले आजीच्या वयाच्या महिलेशी लग्न ।  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • 24 वर्षांच्या कुराण मॅककेन आणि 61 वर्षीय चेरिल मॅकग्रेगर यांनी 3 सप्टेंबर रोजी लग्न केले,
  • कुरानने तिला लग्नासाठी प्रपोज केले तेव्हा चेरिलला धक्का बसला
  • दोघांमधील अंतरामुळे सोशल मिडियावर नेगेटिव्ह प्रतिक्रिया

वाॅशिंटन :  61 वर्षीय आजीने  तिच्या वयाच्या 17 वर्षी 24 वर्षांच्या प्रियकराशी लग्न केले होते. त्या दोघांच्या वयातील मोठ्या अंतरांमुळे सोशल मिडियावर त्यांना नेगेटिव्ह कमेन्टस् येत आहे. अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील रोम येथील 24 वर्षीय कुराण मॅककेन आणि 61 वर्षीय चेरिल मॅकग्रेगर यांनी 3 सप्टेंबर रोजी एका रोमँटिक सोहळ्यात लग्न केले. ( A 24-year-old man marries a woman his grandmother's age)

जरी चेरिल ही कुराणच्या आजीच्या वयाची असली तरी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले आहोत .या जोडप्याने त्यांच्या TikTok अकाऊंटवर त्यांच्या लग्नाचे थेट प्रक्षेपण केले. ६१ वर्षांची वधू पांढऱ्या लग्नाच्या पोशाख आली. तिने तिचे केस सैल कुरळे केले होते. कुराणने पांढऱ्या रंगाचा सूट घातला होता आणि या प्रसंगी त्याने केस आणि दाढी रंगवली होती.

हे दोघे 2012 मध्ये पहिल्यांदा भेटले. तेव्हा कुराण अवघ्या 15 वर्षांचा होता आणि तो चेरिलचा मुलगा ख्रिसच्या फास्ट-फूड रेस्टॉरंटमध्ये काम करीत होता. मधली अनेक वर्षे ते दोघे संपर्कात नव्हते. परंतु 4 नोव्हेंबर 2020 रोजी पुन्हा कनेक्ट झाले, जेव्हा कुराणने चेरिलला कॅशिअर डेस्कच्या एका नेहमीच्या दुकानात पाहिले. या वर्षी 31 जुलै रोजी कुराणने चेरिलला अंगठी देऊन प्रपोज केले.

कुराण सांगतो की,  "मी चेरिलला माझी पत्नी बनवण्याची अनेक कारणे आहेत. ती सुंदर, मोहक, मजबूत, उदात्त, प्रामाणिक आहे. चेरिलला धक्का बसला कारण तिला माहित नव्हते की मी प्रपोज करणार आहे. पण हे तिच्यासाठी विशेष होते. यापूर्वी  माझे लग्न झालेले नाही पण तिचे झाले आहे, ”

कुराण पुढे म्हणाला, चेरिलच्या सात मुलांपैकी तिघांनी या जोडप्याच्या नात्याला परवानगी दिली आहे. तसेच कुराणचे कुटुंबियांचा या नात्याला पाठिंबा आहे. मात्र, या जोडप्याच्या नात्याबद्दल काही नकारात्मक कमेन्टस् मिळाल्या आहेत. "आम्हाला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या कमेन्टस् मिळाल्या आहेत.. त्याचा विचार न करता आम्ही सामान्य जीवन जगणार आहोत,"

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी