Shadi Viral Video: प्रेमात यांनी नाही पाहिलं वय; 52 वर्षाच्या महिलेने 21 वर्षाच्या मुलाशी बांधली लगीनगाठ

या व्हिडिओतील मुलाचं म्हणणं आहे की, प्रेमात वय पाहिलं जातं नाही आणि मी तेच केलं. तो त्याच्या पेक्षा 31 वर्षांनी मोठ्या प्रेयसीवर नितांत प्रेम करतो. तर प्रेयसी महिला म्हणतेय की, आता माझा परफेक्ट साथीदाराचा शोध संपला आहे. आणि मला खरं प्रेम मिळालं असून मी त्याच्यासोबत आनंदाने जीवन जगेल. परंतु हा व्हिडिओ कुठला आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही.

A 52-year-old woman tied the knot with a 21-year-old boy
प्रेमात यांनी नाही पाहिलं वय; 52 वर्षाच्या महिलेने 21 वर्षाच्या मुलाशी बांधली लगीन गाठ   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच लोक देतायत प्रतिक्रिया.
  • व्हिडिओ कुठला हे अद्याप समजलेले नाही.
  • 31 वर्ष मोठ्या महिलेशी मुलाने केलं लग्न

Shadi Viral Video of 21 year boy and 52 year woman: प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं शेम असतं असं आपण म्हणतो परंतु या जोडप्याचं तसं नाहीये. यांचे प्रेम इतकं आंधळं आहे की त्यांनी थेट वयाच्या सीमा पार केल्या आहेत. या जोडप्याला पाहिल्यानंतर  आपल्या डोक्यात प्रेमात वय पाहिलं जात नाही हेच वाक्य फिरत राहतं. या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका मुलाने तब्बल 31 वर्ष मोठ्या असलेल्या महिलेशी लगीनगाठ बांधली आहे.  (A 52-year-old woman tied the knot with a 21-year-old boy )

अधिक वाचा  : लैंगिक संबंध ठेवताना महिला खोटं का बोलतात?

या व्हिडिओतील मुलाचं म्हणणं आहे की, प्रेमात वय पाहिलं जातं नाही आणि मी तेच केलं. तो त्याच्या पेक्षा 31 वर्षांनी मोठ्या प्रेयसीवर नितांत प्रेम करतो. तर प्रेयसी महिला म्हणतेय की, आता माझा परफेक्ट साथीदाराचा शोध संपला आहे. आणि मला खरं प्रेम मिळालं असून मी त्याच्यासोबत आनंदाने जीवन जगेल. परंतु हा व्हिडिओ कुठला आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या जोडप्यानुसार, दोघे एकमेंकांना तीन वर्षापासून ओळखत होते आणि नात्यात होते. त्यानंतर दोघांनी लग्न करणयाचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

अधिक वाचा  : बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांना कोर्टाचं समन्स

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकतात की, 21 वर्षाचा नवरदेव हा आपल्या वधू सोबत उभा आहे. दोघांनी गळ्यात वरमाला घातल्या आहेत. त्यांचा व्हिडिओ  बनवणारा व्यक्ती त्यांना प्रश्न करतोय की,तुम्ही लग्न केलं का? त्यावर तो मुलगा हो असं उत्तर देतो. त्यानंतर व्हिडिओ बनवणारा त्याचं वय विचारतो, त्यावेळी मुलगा आपलं वय 21 असल्याचं सांगतो. त्यानंतर महिलेचं वय विचारलं जातं. त्यावर तो उत्तर देतो की, तिचं वय 52 वर्ष आहे. 

मालमत्तेसाठी लग्न केलं 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत, एक युजर म्हणतो, मुलगा शिकलेला दिसत आहे, मालमत्तेसाठी त्याने आंटीशी  लग्न केल्याचे दिसते, तर दुसऱ्या युजरने लिहिले - 'आणि कलियुगाचा शेवटचा टप्पा त्याला हार घालताच सुरू झाला'
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी