OMG: ऐकलं का! एका पाण्याच्या बाटलीची किंमत ६५ लाख रूपये; जाणून घ्या यामागील खास कारण 

व्हायरल झालं जी
Updated Jun 16, 2022 | 12:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

World Most Expensive Water । जेव्हा कधीही आपण बाहेर फिरायला अथवा कोणत्याही कामासाठी जातो तेव्हा सोबत पाणी घेऊन जातो. कारण पाण्याची बाटली सोबत घेतल्याने बाहेर कुठेही पाणी विकत घेण्याची गरज भासत नाही. बहुतांश लोक तर अगदी असेच करतात.

A bottle of water costs Rs 65 lakh, Find out the special reason behind this
ऐकलं का! एका पाण्याच्या बाटलीची किंमत तब्बल ६५ लाख रूपये  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एका पाण्याच्या बाटलीची किंमत तब्बल ६५ लाख रूपये.
  • बाटलीच्या किमतीची सोशल मीडियावर रंगली चर्चा.
  • बेव्हरली या कंपनीने बनवलेल्या बाटलीची किंमत ६५ लाख रूपये आहे.

World Most Expensive Water । नवी दिल्ली : जेव्हा कधीही आपण बाहेर फिरायला अथवा कोणत्याही कामासाठी जातो तेव्हा सोबत पाणी घेऊन जातो. कारण पाण्याची बाटली सोबत घेतल्याने बाहेर कुठेही पाणी विकत घेण्याची गरज भासत नाही. बहुतांश लोक तर अगदी असेच करतात. खूप कमी लोक असतात, अथवा आर्थिक बाजू मजबूत असलेली लोक विकतचे पाणी पितात. मात्र तुम्हीही कधीतरी बाहेर पाण्याची बॉटल विकत घेतली असले. त्या बाटलीची किंमत २० ते ३० किंवा जास्तीत जास्त ५० पर्यंत असू शकते. यापेक्षा महाग असलेली पाण्याची बॉटल आपण सहसा खरेदी करत नाही. (A bottle of water costs Rs 65 lakh, Find out the special reason behind this). 

अधिक वाचा : श्रावमध्ये भगवान शंकराच्या कृपेमुळे या ३ राशींचे चमकणार नशीब

एका पाण्याच्या बाटलीची किंमत तब्बल ६५ लाख रूपये

दरम्यान, आज आपण अशाच एका पाण्याच्या बाटलीबद्दल भाष्य करणार आहोत, ज्याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जर तुम्ही ही पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी गेलात तर तुम्हाला तुमची संपूर्ण मालमत्ता विकावी लागू शकते. तुम्ही इतर अनेक महागड्या गोष्टी ऐकल्या असतील, पण एवढ्या महागड्या बाटलीबद्दल कदाचित ऐकलही नसेल. लक्षणीय बाब म्हणजे एका पाण्याच्या बाटलीची किंमत तब्बल ६५ लाख रूपयांपेक्षा जास्त आहे. 

जे लोक हिरे-मोती आणि सोने-चांदीला सर्वात महाग मानतात, आज ही पाण्याची बाटली ऐकून त्यांना धक्काच बसेल. या पाण्याच्या बाटलीची किंमत ऐकून लोक चक्रावून गेले आहेत. कारण एका पाण्याच्या बाटलीसाठी ६५ लाख रुपये मोजावे लागतात, असे कोणी तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वासही बसणार नाही. पण ही सत्य घटना आहे. 

यामुळे आहे एवढी किंमत

लक्षणीय बाब म्हणजे (Beverly Hills) 90H20 कंपनीच्या पाण्याच्या बाटलीची किंमत ६५ लाख रुपये आहे. याचा अर्थ त्यांच्या पाण्याच्या थेंबाचीही किंमत हजारो रुपये आहे. खर तर ही पाण्याची बाटली लॉन्च करताना, बेव्हरली कंपनीने त्याचे झाकण १४ कॅरेट पांढर्‍या सोन्यापासून बनवले आहे. याशिवाय या पाण्याच्या बाटलीच्या टोपणावर २५० हिरे जडले आहेत. त्यामुळे त्याची किंमत खूप वाढली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी