OMG: ऐकावं ते नवलच! ऑनलाइन अभ्यासाबद्दल मोठ्या विद्यापीठातून चक्क मांजराला मिळाली पदवी

Shocking News In Marathi | आजपर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे प्राणी पाहिले किंवा ऐकले असतील. अनेक पाळीव प्राण्यांचे चमत्कार पाहून लोक थक्क होतात. पण आजकाल अशी एक मांजर चर्चेत आहे, जी हुशारही आहे आणि पदवीधर देखील आहे.

 a Cat graduated from a large university with a degree in online studies
ऑनलाइन अभ्यासाबद्दल चक्क मांजराला मिळाली पदवी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा अंदाज लावणे देखील खूप कठीण आहे
  • ऑनलाइन अभ्यासाबद्दल मोठ्या विद्यापीठातून चक्क मांजराला मिळाली पदवी.
  • या मांजराचे नाव सूकी असे आहे.

Shocking News In Marathi | मुंबई : आजपर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे प्राणी पाहिले किंवा ऐकले असतील. अनेक पाळीव प्राण्यांचे चमत्कार पाहून लोक थक्क होतात. पण आजकाल अशी एक मांजर चर्चेत आहे, जी हुशारही आहे आणि पदवीधर देखील आहे. तुमचाही यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. लक्षणीय बाब म्हणजे या मांजराची सर्वत्र चर्चा होत असून लोक त्याच्या या हुशारीचे कौतुक करत आहेत. (A Cat graduated from a large university with a degree in online studies). 

अधिक वाचा : जवान विपुल इंगवले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उसळला जनसागर

दरम्यान, या मांजराचे नाव सूकी असे आहे, त्याने अलीकडेच एका मोठ्या महाविद्यालयातून पदवी मिळवली आहे. तीही दररोज क्लासला जाऊन. असे सांगितले जात आहे की फ्रान्सिस्का बॉर्डियर नावाची मुलगी टेक्सास विद्यापीठात शिकत आहे. तिच्याकडे सूकी नावाची एक मांजर आहे, जी नेहमीच फ्रान्सिस्कासोबत असते. कोरोनाच्या काळात फ्रान्सिस्का लॅपटॉपद्वारे ऑनलाइन क्लासेस घेत असे. फ्रान्सिस्कासोबत सूकीही तिच्यासोबत त्यावेळी बसत असे. सूकी एका विद्यार्थ्याप्रमाणे संपूर्ण वर्गात हजेरी लावायची. फ्रान्सिस्का म्हणते की तिची मांजर सूकीने सर्व क्लासला हजेरी लावली आहे, ती नेहमीच माझ्यासोबत असायची. 

पदवी असलेली मांजर 

तर, जेव्हा ग्रज्युएशन डे आला तेव्हा ती तिच्या मांजराला समारंभात घेऊन गेली. फ्रान्सिस्काने सूकीसाठी खास ड्रेसही बनवला. जी बाकीच्यांच्या ड्रेसशी मॅच होत होता. फ्रान्सिस्काने सोशल मीडियावर सूकीचे काही फोटोही शेअर केले आहेत, जे लोकांना खूप आवडत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे अधिकृतपणे सूकीला कोणतीही पदवी मिळाली नाही, परंतु लोक तिला पदवीधर मांजर म्हणून सन्मानित करत आहेत. इतकेच नाही तर सूकीची ही भन्नाट स्टोरी लोकांना खूप आवडत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी