Viral News In Marathi | मुंबई : विमानतळाच्या लगेज बेल्टवर (airport luggage belts) अनेकदा बॅगा किंवा पिशव्या पाहायला मिळतात. विमानतळावरून प्रत्येक प्रवासी त्याला हव्या त्या ठिकाणी कमी वेळात प्रवास करू शकतो. प्रवाशांना फ्लाइटमधून उतरल्यानंतर सर्व सामान लगेज बेल्टजवळ सापडते. तिथे प्रत्येक प्रवासी आपल्या सामानाचा दावा करू शकतात. पण तुम्ही या बेल्टवर तुमचे सामान येण्याची वाट पाहत असाल आणि सामान म्हणून कोणती भलतीच गोष्ट आली तर काय कराल? अशीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. (A dead Body Arrived at the Airport Luggage Blade? Excitement erupted among the passengers).
अधिक वाचा : संभाजीराजे छत्रपतींनी नाकारली शिवसेनेची अट वाली ऑफर
दरम्यान, झाले असे की विमानतळाच्या बेल्टवर सामान म्हणून चक्क एक व्यक्ती पॅक केलेले पाहायला मिळाले? अशी चर्चा तिथे रंगली होती. कदाचित असेच असावे जे या व्हायरल व्हिडीओमध्ये उपस्थित प्रवाशांच्या बाबतीत घडले असावे.
अधिक वाचा : आता तुम्ही 10 मिनिटांत ई-पॅन कार्ड PDF करू शकता डाउनलोड
हा व्हायरल व्हिडीओ लंडन मधील एका विमानतळावरील आहे, जिथे लगेच बेल्टजवळ उभे राहून लोक आपल्या सामानाची वाट पाहत होते. दरम्यान, लगेज ब्लेटवर एक विचित्र आडवी वस्तू दिसली. ही वस्तू अशी होती की तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सामान पाहून तुम्हालाही असे वाटेल की यात एखाद्या व्यक्तीला घडी घालून पॅक केले आहे. पॅक करण्यासाठी त्यावर बरीच वर्तमानपत्र गुंडाळले जातात आणि नंतर ते टेपने घट्ट चिकटवले जाते. लगेज बेल्टवर अशा प्रकारे पॅक केलेले हे सामान पाहून लोकांना आश्चर्य वाटले.
लगेज बेल्टवर फिरत असलेल्या या विचित्र वस्तूचा व्हिडीओ 'व्हायरलहॉग' नावाच्या ट्विटर हँडलने पोस्ट केला आहे. या ट्विटर हँडलनुसार, लगेज ब्लेटवर दिसणारी ही वस्तू प्रत्यक्षात एक पुतळा दिवा आहे. म्हणजेच ज्या दिव्यामध्ये दिवा मानवी मुद्रेवर बसेल. यामुळेच त्याचे पॅकिंग वेगळ्या प्रकारचे दिसते. प्रत्येकजण या सामानाकडे धक्कादायक अवस्थेत पाहत आहे. या विचित्र पॅकिंगचे सामान पाहून लोक केवळ आश्चर्यचकित झाले नाहीत, तर ते काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हे प्रकरण नक्की काय आहे हे प्रत्येकाच्या हावभावावरून स्पष्ट दिसत आहे.