Viral: मद्यधुंद महिला अधिकाऱ्याने भररस्त्यात घातला धिंगाणा; पोलिस कर्मचाऱ्याला दिली धमकी 

व्हायरल झालं जी
Updated May 02, 2022 | 16:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Drunk Woman Officer Video । : सोशल मीडियावर सतत काही ना काही भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ तर अशा असतात ज्यांना पाहून आपल्याच डोळ्यांवर आपला विश्वास बसत नाही. काही व्हिडिओ सोशल मीडियावरील युजर्सचे मनोरंजन करत असतात, कर काही व्हिडिओ हैराण करणाऱ्या असतात.

A drunken female officer has made a big fuss
मद्यधुंद महिला अधिकाऱ्याने भररस्त्यात घातला धिंगाणा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर सतत काही ना काही भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात
  • सध्या असाच एक गोंधळ निर्माण करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
  • मद्यधुंद महिला अधिकाऱ्याने भररस्त्यात घालत महिला पोलिस कर्मचाऱ्याला धमकी दिली.

Drunk Woman Officer Video । नवी दिल्ली : सोशल मीडियावर सतत काही ना काही भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ तर अशा असतात ज्यांना पाहून आपल्याच डोळ्यांवर आपला विश्वास बसत नाही. काही व्हिडिओ सोशल मीडियावरील युजर्सचे मनोरंजन करत असतात, कर काही व्हिडिओ हैराण करणाऱ्या असतात. दरम्यान सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहून तुम्ही देखील प्रशासनावर प्रश्न उपस्थित कराल. कारण या व्हिडिओमध्ये एक महिला अधिकारी मद्यधुंद अवस्थेत एका महिला पोलिस कर्मचाऱ्याशी वाद घालताना दिसत आहे सोबतच ती पोलिस कर्मचाऱ्यांना धमकी देखील देत आहे. (A drunken female officer has made a big fuss). 

दरम्यान, सध्या चर्चेत असलेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील आहे, जिथे एक महिला अधिकारी दारू पिऊन महिला पोलिस कर्मचाऱ्याशी वाद घालत आहे. ही महिला अधिकारी उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यात सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

अधिक वाचा : PM मोदींनी बर्लिनमध्ये घेतली भारतीय वंशांच्या लोकांची भेट

संपूर्ण प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद 

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना पोलिसांनी महिला अधिकाऱ्याला अडवल्यावर तिने गोंधळ घालायला सुरूवात केली आणि आयुक्तांसह पोलिसांना धमकावण्यास सुरूवात केली. हा संपूर्ण प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

दरम्यान खुद्द महिला अधिकारी पोलिस कर्मचाऱ्याला आपण एक अधिकारी असल्याचे सांगत आहे. तसेच महिला पोलिस कर्मचाऱ्याला धमकी देत आहे. तिने धमकी देताना म्हटले की, "मी विभागीय स्तरावरील अधिकारी आहे जिल्हापातळीवरील नाही. मी सरळ आयुक्तांशी फोनवरून बोलेन. मला माहित आहे तुम्ही आयुक्तांकडे जाल आणि हे झालं ते झालं असे सांगत बसाल." 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी