चहावाल्याची मुलगी झाली फ्लाईंग ऑफिसर, जाणून घ्या तिचा थक्क करणारा प्रवास

Daughter of a Tea Seller become Flying Officer in IAF: असं म्हणतात की, आपल्या इच्छाशक्तीत ताकद असेल तर प्रत्येक प्रवास सोपा होतो, हीच गोष्ट नीमच मध्यप्रदेशातील एका तरुणीनं खरी करून दाखवली आहे. जाणून घ्या...

Aanchal Gangwal
चहावाल्याची मुलगी झाली फ्लाईंग ऑफिसर, जाणून घ्या तिचा प्रवास 

थोडं पण कामाचं

  • मध्यप्रदेशातील एका मुलीनं आंचल गंगवालनं आपल्या वडीलांचं नाव केलं उज्ज्वल
  • नीमच मध्यप्रदेशातील एका चहा विक्रेत्याची मुलगी बनली फ्लाईंग ऑफिसर
  • मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करून केलं अभिनंदन

भोपाळ: प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांनी ती प्रत्येक गोष्ट मिळवावी, जी त्यांना शक्य झाली नाही, असाच विचार करतात. ज्यांचे मुलं हे खरं करून दाखवतात, ते खूपच नशीबवान असल्याचं म्हटलं जातं. मध्यप्रदेशातील नीमचमध्ये चहा विकणाऱ्या एका व्यक्तीच्या २४ वर्षीय मुलीनं फ्लाईंग ऑफिसर बनण्याचा विक्रम केलाय. आंचल गंगवाल असं या तरुणीचं नाव आहे. ती भारतीय वायुसेनेत (IAF)मध्ये फ्लाईंग ऑफिसर बनली आहे. आंचलचे वडील सुरेश गंगवाल मध्यप्रदेशची राजधानी भोपाळपासून ४०० किलोमीटर दूर नीमचमध्ये बस स्टँडवर मागील २५ वर्षांपासून एक चहाची टपरी चालवतात.

सुरेश गंगवाल यांनी सांगितलं, ‘वर्ष २०१३ मध्ये उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये आलेल्या भीषण वादळानंतर वायुसेनेचे कर्मचारी मोठ्या शौर्यानं तिथल्या लोकांची मदत करत होते. ते आंचलनं पाहिलं होतं आणि तेव्हापासून तिनं फ्लाईंग ऑफिसर बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं. हे स्वप्न आता पूर्ण झालंय.’ वडीलांनी आपल्या मुलीचं हे यश पाहून खूप आनंद व्यक्त केलाय आणि याचं पूर्ण श्रेय मुलीच्या मेहनतीला दिलंय.

सुरेश गंगवाल म्हणाले, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आंचलनं पुस्तकं गोळा करून परीक्षेची तयारी सुरू केली. ते म्हणतात की, आंचल सहाव्या प्रयत्नात या परीक्षेत पास झाली. सुरेश गंगवाल पुढे म्हणतात, ‘मी मागील २५ वर्षांपासून चहाचं दुकान चालवतोय. म्हणून कुणीही माझी आर्थिक परिस्थिती ओळखू शकतो की, ती कशी असेल?’

मुख्यमंत्र्यांनी लिहिलं, अंधाराला चिरून एका मुलीनं ‘आंचल’नं रचला इतिहास

आंचलच्या या यशावर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट केलंय, ‘नीमचमध्ये चहाचं दुकान चालवणारे सुरेश गंगवालजी यांची मुलगी आंचल आता वायुसेनेत फायटर प्लेन उडवणार आहे. मध्यप्रदेशची मान वाढवणारी मुलगी आंचल आता देशाचा गौरव आणि सन्मानाचं रक्षण करण्यासाठी आकाशात उंच भरारी घेणार आहे. मुलीला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद’

वडीलांकडून शुभेच्छा

हायस्कूल पास केलेल्या सुरेशनं सांगितलं, ‘अनेकदा माझ्याजवळ मुलीच्या शाळेची फी किंवा कॉलेजची फी भरायला पण पैसे राहत नव्हते. अनेकदा मी लोकांकडून उधार मागून तिची फी भरली आहे.’ सुरेश गंगवाल पुढे म्हणाले की, मुलीचं फ्लाईंग ऑफिसर होणं आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी