Video : चक्क गाजरापासून बनवली सनई, संगीत ऐकून आनंद महेंद्रा झाले मंत्रमुग्ध

Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गाजराची सनई बनवून संगीत वाजवताना दिसत आहे.

a man created clarinet with carrot and started playing music video goes viral
Video : चक्क गाजरापासून बनवली सनई, संगीत ऐकून आनंद महेंद्रा झाले मंत्रमुग्ध   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे
  • एक व्यक्ती गाजराची सनई बनवून संगीत वाजवताना दिसत आहे
  • संगित एेकून प्रक्षेक मंत्रमुग्ध झाले

Viral Video : जगात प्रतिभावान लोकांची कमी नाही. जगातील काही लोक इतके प्रतिभावान असतात की ते नेहमी काही ना काही प्रयोग करत राहतात. कधीकधी तर अशा लोकांचे आविष्कार सर्वांनाच आश्चर्यचकित करतात. जर तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं तर तुम्हाला प्रतिभावान लोकांशी संबंधित असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या एपिसोडमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गाजराची सनई बनवून संगीत वाजवताना दिसत आहे. (a man created clarinet with carrot and started playing music video goes viral)

अधिक वाचा : भारतातील एका स्टेशनचं नाव आहे मस्जिद, काय आहे या नावामागील स्टोरी

या प्रतिभावान व्यक्तीचा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर पेजवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गाजर कापून शेकडो प्रेक्षकांसमोर एक अप्रतिम वाद्य बनवताना दिसत आहे. यानंतर तो मधुर संगीत वाजवून लोकांना मंत्रमुग्ध करतो

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती हातात गाजर घेऊन उभा आहे आणि नंतर ड्रिलिंग मशीनच्या सहाय्याने त्यात छिद्र पाडतो आणि नंतर त्याच्या काठावर बासरीसारखे अनेक छिद्र पाडतो. यानंतर, ती व्यक्ती गाजरापासून बनवलेल्या त्या वाद्याने मधुर सूर वाजवू लागते.

अधिक वाचा : Where is Kailas ? : कुठे आहे कैलासा? कसा बनवला नित्यानंदांनी हा देश, काय आहेत सुविधा

व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध संगीतकार लिनसे पोलॅक आहे आणि त्याने गाजर वापरून बनवलेले वाद्य तुम्हाला भारतीय सनईची आठवण करून देईल. आतापर्यंत 5.5 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर 6 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी